आता राज्यभरात पेटणार भाजपचं 'हे' आंदोलन, चंद्रशेखर बावनकुळेंचा सरकारला इशारा

आता राज्यभरात पेटणार भाजपचं 'हे' आंदोलन, चंद्रशेखर बावनकुळेंचा सरकारला इशारा

राज्य सरकारनं शेतकऱ्यांची चालविली आहे थट्टा...

  • Share this:

अमरावती, 11 नोव्हेंबर: अतिवृष्टीनं हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना (Farmer) राज्य सरकारनं (Maharashtra Government) 10 हजार कोटींची मदत जाहीर केली. मात्र, ही मदत तोकडी असल्याने दिवाळीपूर्वी (Diwali Festival) शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये राज्य सरकारनं मदत करावी अन्यथा राज्यभरात सर्व जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयात सकाळी 11 वाजता 'पिठलं भाकर' (चून भाकर )आंदोलन करणार, असा इशारा भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे (BJP Leader Chandrashekhar Bavankule)व भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी दिला आहे.

अमरावतीत झालेल्या पत्रकार परिषदेत चंद्रशेखर बावनकुळे आणि अनिल बोंडे यांनी आपल्या आंदोलनाबाबत माहिती दिली.

हेही वाचा...अहमदनगरमध्ये भर-रस्त्यात गोळ्या झाडून हत्या, न्यायालयाने आरोपींना सुनावली शिक्षा

राज्य सरकारनं दिलेली मदत कोणत्याही शेतकऱ्यांपर्यंत अद्यापही पोहचली नसल्याचा आरोप देखील भाजपनं केला. राज्य सरकारनं शेतकऱ्यांची थट्टा चालविली असून शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जात असल्यानं भाजप शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ मैदानात असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. त्यामुळे 13 नोव्हेंबरपर्यंत सरकारनं मदत न दिल्यास पिठलं-भाकरी आंदोलन करणार असल्याचे या पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आलं आहे.

गडकरींच्या बंगल्यासमोर 'दिवाळी आंदोलन...

दुसरीकडे, केंद्र सरकारचा कृषी कायदा रद्द करावा. त्याचबरोबर राज्यात अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 25 हजार रुपये मदत मिळावी, या मागणीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari Sanghatana agitation) आक्रमक झाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज (मंगळवार) आंदोलन केलं.

भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांच्या बंगल्याकडे निघालेले संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्यासह शेकडो कार्यकत्यांनी पोलिसांनी अडवून त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास नितीन गडकरींच्या बंगल्यासमोर दिवाळी साजरी करणार असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दिला आहे.

स्वाभिमानी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली नागपूरात संविधान चौकात आंदोलन करण्यात आलं. संघटनेच्या कार्यकर्ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरासमोर दिवाळी साजरी करण्यासाठी आले आहे. संविधान चौकात दिवाळी फराळ, आकाश कंदील आणि दिवे लावून आंदोलन करण्यात आलं.

राज्य सरकारनं शेतकऱ्यांना केलेली 10 हजार कोटी रुपयांची मदत तोकडी आहे. त्यामुळं केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर करावी, हमी भावाने कापूस खरेदी करण्यासाठी तालुकानिहाय केंद्र सुरू करण्यासाठी करावे. सोयाबीनला प्रति क्विंटल 6 हजार रुपये जाहीर करावी, पीक विमा कंपन्यांना शेतकऱ्यांना विमा देण्यासाठी केंद्राने बाध्य करावे आणि केंद्राने केलेला कृषी विधेयक रद्द करावे, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

हेही वाचा...महाराष्ट्रात भाजपने नाही तर सत्तेसाठी शिवसेनेने विश्वासघात केला- फडणवीस

राज्यात सर्वच केंद्रीय मंत्र्यांच्या घरासमोर हे आंदोलन करण्यात आलं. केंद्रीय मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापुढं शेतकऱ्यांची व्यथा मांडावी, यासाठी हे आंदोलन करण्यात आलं.

Published by: Sandip Parolekar
First published: November 11, 2020, 6:02 PM IST

ताज्या बातम्या