'औरंगाबादचं नाव संभाजीनगर व्हायलाच हवं, आपण औरंगजेबचे वंशज नाहीत'

'औरंगाबादचं नाव संभाजीनगर व्हायलाच हवं, आपण औरंगजेबचे वंशज नाहीत'

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचे आम्ही वंशज आहोत, औरंगजेबाचे नाही. औरंगाबादचं नाव संभाजीनगर झालंच पाहिजे

  • Share this:

औरंगाबाद,29 फेब्रुवारी:छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचे आम्ही वंशज आहोत, औरंगजेबाचे नाही. औरंगाबादचं नाव संभाजीनगर झालंच पाहिजे, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन संघटनात्मक आढावा घेतला.

चंद्रकांत पाटील म्हणाले, महापालिका निवडणुकात ताकत लावली तर आम्हाला संधी आहे, म्हणून शहरात आलो आहे. बैठक घेत आहे. महापालिका निवडणुकीत आम्ही विजय मिळवणारच असे सांगत या शहराचे नाव संभाजीनगर व्हायलाच हवं, आपण सगळे शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचे वंशज आहोत. आपण औरंगजेबचे वंशज नाहीत. त्यामुळे तांत्रिक अडचणी दूर करून नाव बदलायला हवे.

शेतकरी कर्जमाफी म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे आहे, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली. ही फक्त घोषणा आहे. मनापासून नाही. आता म्हणतात ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहितेमुळे यादी जाहीर करता येणार नाही, मग जे कायदे या आठवड्यात केले ते सगळे रद्द करा, सरपंच निवड कायदा, बाजारसमिती निवडणूक कायदा हे सगळे कायदे रद्द करावे, आम्ही राज्यपालांना निवेदन दिले, असेही पाटील म्हणाले. पाथर्डी शेतकरी आत्महत्याबाबत बोलताना शेतकरी आत्महत्या दुर्दैवी आहे, शेतकऱ्यांच्या पिकांना भाव मिळावा, म्हणून आम्ही प्रयत्न केले, त्यांना मदत करायला हवी, आमच्या सरकारने केलं, जो पर्यंत शेतकऱ्यांना पाणी मिळणार नाही, भाववाढ मिळणार नाही ही परिस्थिती अशीच राहणार, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा..कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर, संध्याकाळपर्यंत खात्यात रक्कम जमा करण्याचे काम सुरू

औरंगाबादच्या गंगापूरमध्ये जी छेडछाड घटना झाली आहे, हे वाढत आहे, आमच्या सरकारने भरपूर काम केलं, मात्र आता हे सगळं विस्कळीत झालं आहे. कायद्याचा धाक उरला नाही आहे. गुंड बिळातून बाहेर पडले आहेत. आम्ही उद्धवजीना म्हटले की, गृह खाते तुमच्याकडे ठेवा. मात्र कुणाचाच इंटरेस्ट नाही, असं चित्र असल्याची टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.

हेही वाचा...चोरट्यांनी पळवले चक्क ATM मशीन, अवध्या तीन मिनिटांत काम फत्ते, Video आला समोर

First published: February 29, 2020, 6:32 PM IST

ताज्या बातम्या