• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • 26 तारखेला सोमय्या नांदेडला येणार आता करा बातमी मोठी, चंद्रकांत पाटलांचा आणखी एक दावा

26 तारखेला सोमय्या नांदेडला येणार आता करा बातमी मोठी, चंद्रकांत पाटलांचा आणखी एक दावा

 ' मला या गोष्टी कशा माहिती होतात तर मी अंतरज्ञानी आहे'

' मला या गोष्टी कशा माहिती होतात तर मी अंतरज्ञानी आहे'

' मला या गोष्टी कशा माहिती होतात तर मी अंतरज्ञानी आहे'

  • Share this:
नांदेड, 19 ऑक्टोबर : नांदेडमध्ये (nanded) देगलूर पोटनिवडणुकीचा आखाडा आता चांगलाच तापला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी लवकरच काँग्रेसच्या (congress) मंत्र्यांची ईडीकडून (ed) चौकशी होणार असे संकेत देऊन टाकले आहे. तर, किरीट सोमय्या हे 26 किंवा 27 तारखेला नांदेडला येणार आहेत, आता करा बातमी मोठी, असा गौप्यस्फोट पाटील यांनी केला आहे. देगलूर पोटनिवडणुकीच्या निमित्ताने चंद्रकांत पाटील हे नांदेडला तळ ठोकून आहे. सोमवारीच पाटील यांनी ईडीची पुढची कारवाई नांदेडला होणार असल्याचे संकेत दिले होते. आज माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत असताना पाटील यांनी आणखी नवा दावा केला. 'माझ्या हसण्यावरुन समजून जा, की कुणावर कारवाई होणार आहे. कालच्या माझ्या सूचक हास्यानंतर आता असं म्हणतो, येत्या 26 किंवा 27 तारखेला किरीट सोमया नांदेडला येणार आहेत, आता बातमी मोठी करा, असं सूचक वक्तव्य पाटील यांनी केलं. शिल्पा-राजविरोधातील आरोप शर्लिनला महागात; कोर्टात 50 कोटींचा मानहानीचा खटला तसंच, ईडीच्या कारवायाबाबत तुम्हाला कसं कळतं असा सवाल अशोक चव्हाण यांनी केला होता यावर पाटील म्हणाले की, ' मला या गोष्टी कशा माहिती होतात तर मी अंतरज्ञानी आहे' असं म्हणत पाटील यांनी चव्हाणांना टोला लगावला. तसंच, इंधनदरवाढी वरून सेनेने खासदार संजय  राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून टीका केली. त्यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. इंधनदरवाढ हा केंद्राचा विषय नाही अशी मांडणी आम्ही करतो. ते राऊतांना कळतं की नाही. त्यांच्या डोक्यात काही जातं की नाही. मुळात राज्याने आपला कर कमी केलेला नाही. पेट्रोल आणि डिझेल जीएसटीत आणण्यासाठी अजित पवार यांनी विरोध केला आहे. तुम्हाला त्याचा मलीदा हवा आहे, असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला. T20 World Cup : भारत पाकिस्तानविरुद्ध खेळला नाही तर... काय आहे ICC चा नियम? सामनाच्या अग्रलेखातील टिकेला केंदीय मंत्री नारायण यांनी प्रहारमधून उत्तर दिले. हे ठोश्याला ठोशा आहे. सरकारमध्ये असताना सुद्धा सामनामधून रोज टीका व्हायची .आता राणे साहेबांनी ठरवलं असेल प्रहार मधून प्रहार करायचा तर चांगलं आहे. आम्ही काही बोलत नाही म्हणून तुम्ही काहीही आणि कितीही बोलणार का, मी अधून मधून ठोसा देत असतो, असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला. 'राणे साहेबांना हे लोक घाबरतात म्हणून ते बोलले तर आणखी सोपं होईल. हा कलगीतुरा थांबवायचा असेल तर एकत्र बसून निर्णय करावा लागेल. आम्ही पातळी सोडून बोलणार नाही. तुम्हीही बोलू नका असं ठरवावं लागेल, असंही पाटील म्हणाले.
Published by:sachin Salve
First published: