मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

सत्ताधाऱ्यांना 'हा' डोस घेतल्याशिवाय झोपच लागत नाही, चंद्रकांत पाटलांचा टोला

सत्ताधाऱ्यांना 'हा' डोस घेतल्याशिवाय झोपच लागत नाही, चंद्रकांत पाटलांचा टोला

मुख्यमंत्र्याना पुन्हा डिवचलं, दसरा मेळाव्यातील भाषण हे कुणाचं होतं हे कळलंच नाही.

मुख्यमंत्र्याना पुन्हा डिवचलं, दसरा मेळाव्यातील भाषण हे कुणाचं होतं हे कळलंच नाही.

मुख्यमंत्र्याना पुन्हा डिवचलं, दसरा मेळाव्यातील भाषण हे कुणाचं होतं हे कळलंच नाही.

पंढरपूर, 26 नोव्हेंबर: राज्यातील महाविकास आघाडी सरकारला (Maha vikas Aaghadi Government) एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP Leader Chandrakant Patil) यांनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

सरकारच्या कामावर कोणीही समाधानी नाही. तसेच चंद्रकांत पाटील नावाची गोळी घेतल्याशिवाय सत्ताधाऱ्यांना झोपच लागत नाही, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

हेही वाचा..प्रताप सरनाईकांच्या बालपणीच्या मित्रानं MMRDAला लावला कोट्यावधींचा चूना

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे दोघे याच विभागातील आहेत. त्यामुळे ही निवडणूक दोघांसाठी आता प्रतिष्ठेची बनली आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील गुरुवारी पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील प्रचारासाठी सांगोला येथे आले होते. यावेळी त्यांनी सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही.

चंद्रकांत पाटील म्हणाले, महाविकास आघाडी सरकारला आता वर्ष होत असलं तरी कोणत्याच कामात जनता समाधानी नाही. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात देखील सुद्धा सरकार अपयशी ठरलं आहे. मुख्यमंत्री घरात बसूनच सर्व काही करत आहेत. दसरा मेळाव्यातील भाषण हे कुणाचं होतं हे कळलच नाही. बाळासाहेब ठाकरेंची भाषणला एक वेगळी पद्धत होती.

माझ्यावर टीका करण्याशिवाय महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना काम नाही. दिवसांतून पाच वेळा तरी 'चंद्रकांत पाटील' यांचे नाव घेतल्याशिवाय त्यांना झोप लागत नाही. माझ नाव आता त्यांना झोपेच्या गोळीसारखं झालं आहे, असा टोला चंद्रकांतदादा यांनी लगावला आहे.

उद्धव ठाकरे हे प्रशासनासाठी जन्मले नाहीत तर...

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर विखारी टीका केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि प्रशासनाचा काय संबंध? असा थेट सवाल करत उद्धव ठाकरे हे प्रशासनासाठी जन्मले नाहीत तर ते पक्ष चालवण्यासाठीच जन्मले आहेत, असं टीकास्त्र देखील चंद्रकांत पाटील यांनी सोडलं आहे. प्रशासन चालवणं ही सोपी गोष्ट नाही. उद्धव ठाकरेंना प्रशासनाशी संबंधित शंभर प्रश्न विचारले तर त्यांना उत्तरं देता येणार नाही, अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी शरसंधान साधलं आहे.

चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टार्गेट केलं. उद्धव ठाकरे यांना प्रशासन चालवता येत नाही. ते केवळ पक्ष चालवू शकतात. कारण ते कधी साधे नगरसेवक झाले नाही, आमदार आणि खासदार तर दुरची गोष्ट. राज्याचं प्रशासन चालवताना कोर्टात हजार प्रश्न घेऊन बसावं लागतं, संबंधित अधिकाऱ्यांना प्रश्न हाताळण्याचे आदेश द्यावे लागतात. प्रशासनावर वचक असणं ही वेगळी बाब आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनीही पक्षावरच कायम कंट्रोल ठेवला. त्यांनीही कधी निवडणूक लढवली नाही. बाळासाहेबांनी जो नियम पाळला. तो उद्धव ठाकरेंनी पाळला नाही. एकदम अंगावर जबाबदारी पडल्यावर असं होतं.

हेही वाचा...मनसैनिकाच्या डोक्यात भर चौकात घातली होती गोळी, पोलिसांनी आवळल्या एकाच्या मुसक्या

त्यामुळेच राज्यातील प्रश्न सोडवण्यात त्यांना सपशेल अपयश आलं आहे, असाही टोला चंद्रकांतदादांनी यावेळी लगावला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे. आम्ही समोरासमोर बसू त्यांनी केवळ 'क्रॉस सबसिडी' म्हणजे काय याचा अर्थ सांगावा. एवढं नाही तर त्यांनी पुस्तकं पाहून उत्तरं द्यावीत, असं आव्हान चंद्रकांतदादांनी उद्धव ठाकरेंनी दिलं. पण कोणत्या पुस्तकात उत्तर आहे, हे देखील उद्धव ठाकरेंना सांगता येणार नाही, असा टोलाही यावेळी चंद्रकांतदादांनी लगावला.

First published:

Tags: Chandrakant patil, Maharashtra, Shiv sena, Udhav thackeray