चंद्रकांत पाटलांचा दणका, 14 जणांची पक्षातून हकालपट्टी

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तब्बल 14 जणांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 12, 2019 02:56 PM IST

चंद्रकांत पाटलांचा दणका, 14 जणांची पक्षातून हकालपट्टी

मुंबई, 12 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेची युती झाल्यानंतर दोन्ही पक्षातील अनेक इच्छुक नाराज झाले. या इच्छुकांनी थेट बंडखोरी करत उमेदवारी अर्जही दाखल केला. त्यामुळे अनेक मतदारसंघात भाजप आणि सेनेची डोकेदुखी वाढली आहे. कारण बंडखोरांमुळे होणाऱ्या मतविभाजनाचा काँग्रेस-राष्ट्रवादीला फायदा होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तब्बल 14 बंडखोरांचा पक्षातून हकालपट्टी केली आहे.

अनेक मतदारसंघात भाजप आणि सेनेच्या बंडखोरांनी युतीच्या उमेदवाराला खुलं आव्हान दिलं आहे. काही ठिकाणी तर अपक्ष उभा राहिलेल्या उमेदवाराच्या मागे या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ताकद उभी केली आहे. त्यामुळे युतीच्या उमेदवाराची अडचण झाली आहे. म्हणूनच चंद्रकात पाटील यांनी आतापर्यंत 14 जणांना पक्षातून काढून टाकलं आहे.

भाजप आणि शिवसेनेसाठी यंदाची विधानसभा निवडणूक सोपी असल्याचं मानलं जात असतानाच युतीला धक्का बसला आहे. कारण जवळपास 50 मतदारसंघांमध्ये बंडखोरांनी भाजप-सेना युतीची डोकेदुखी वाढवली आहे.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेची युती झाली आहे. मात्र या दोन्ही पक्षांमध्ये निवडणुकीची घोषणा होण्याआधीच मोठ्या प्रमाणात इनकमिंग झालं होतं. त्यामुळे मतदारसंघात उमेदवारीसाठी मोठ्या प्रमाणात होणाऱ्या स्पर्धेतून युतीला बंडखोरीचा सामाना करावा लागत आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, पुणे, सोलापूर, कोकणातील कुडाळ, सावंतवाडी, गुहागर यासह विदर्भ आणि मराठवाड्यातीलही अनेक जागांवर युतीतील नाराज नेत्यांनी बंडाचं अस्त्र उगारलं आहे. त्यामुळे बंडखोर नेते भाजप-शिवसेनेचं गणित बिघडवणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

Loading...

'उद्धव ठाकरेंवरच कारवाई करा'

भाजपच्या जिल्हाध्यक्षाने थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरच कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केला आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार नितेश राणे यांच्यासमोर शिवसेनेच्या सतीश सावंत यांचं आव्हान असणार आहे. सतीश सावंत हे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत.

ही जागा युतीत भाजपच्या वाट्याला गेली असतानाही शिवसेनेनं या जागेवर आपला उमेदवार उभा केल्याचा भाजपचा दावा आहे. त्यामुळे भाजपच्या जागेवर शिवसेनेच्या उमेदवाराला AB फॉर्म देणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्यावर महायुतीने कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी केली आहे.

SPECIAL REPORT: तळकोकणातील राजकीय शिमग्यात मुख्यमंत्र्यांची उडी?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 12, 2019 02:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...