Home /News /maharashtra /

PM Narendra Modi : 'पंतप्रधानांशी तुम्ही खेळ खेळत आहात', चंद्रकांत पाटील यांचा पंजाब सरकारवर निशाणा

PM Narendra Modi : 'पंतप्रधानांशी तुम्ही खेळ खेळत आहात', चंद्रकांत पाटील यांचा पंजाब सरकारवर निशाणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सुरक्षेत गंभीर चूक झाल्याने त्यांची पंजाबमधील (Punjab) रॅली रद्द करण्यात आली आहे. या घटनेवरुन भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पंजाब सरकारवर (Punjab Government) निशाणा साधला आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 5 जानेवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सुरक्षेत गंभीर चूक झाल्याने त्यांची पंजाबमधील (Punjab) रॅली रद्द करण्यात आली आहे. काही आंदोलनकर्त्यांनी मोदींच्या ताफ्याला अडवलं. त्यामुळे पंतप्रधान मोदींचा ताफा हा 15 ते 20 मिनिटांपर्यंत फ्लायओव्हरवर अडकला होता. या घटनेचे पडसाद आता देशभरात पडताना दिसत आहेत. या घटनेनंतर देशभरातील भाजप नेत्यांकडून पंजाब सरकारवर (Punjab Governmet) टीका केली जातेय. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chanrakant Patil) यांनी देखील या घटनेवर नाराजी व्यक्त करत पंजाब सरकारवर निशाणा साधला आहे. चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले? "पंतप्रधानांशी तुम्ही खेळ खेळत आहात. या देशातल्या आणि जगभरात पसरलेल्या भारतीय माणसाला कधीच रुचणार नाही. पंजाब सरकारने सुरक्षेची काळजी घ्यायला हवी होती. त्यांनी रोड क्लिअर आहे याची हमी दिल्यानंतरच बाहेरुन ताफा निघाला. पंतप्रधानांच्या सुरक्षेत अशी ढिलाई कधीच केली जात नाही. ते बाय हेलिकॉप्टरने जाणार होते ते मान्य. पण आताच एक मोठी दुर्घटना घडल्यामुळे सल्ला असा दिला गेला की, आपल्याला बायरोडने जाता येणार नाही. ते 20 मिनिटे थांबले, क्लिअरन्स मिळाला आणि तुम्ही त्या रोडला जनरल पब्लिकला अॅक्सिस देता, ते न क्षमा करण्यासारखं आहे", असं चंद्रकांत पाटील म्हणाले. हेही वाचा : उद्यापासून राज्यात मेघ गरजणार; विकेंडला वाढणार पावसाचा जोर, या जिल्ह्यांना इशारा केंद्रीय गृह मंत्रालयाचं वक्तव्य... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात सुरक्षेचा भंग करण्यात आला. आज सकाळी पंतप्रधान भटिंडा येथे उतरले तेथून ते हेलिकॉप्टरने हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकावर जाणार होते. पाऊस आणि खराब दृश्यमानतेमुळे, पंतप्रधानांनी हवामान स्वच्छ होण्याची सुमारे 20 मिनिटे वाट पाहिली. जेव्हा हवामान सुधारले नाही, तेव्हा असे ठरले की तो रस्त्याने राष्ट्रीय मेरीटर्स मेमोरियलला भेट देईल, ज्यासाठी 2 तासांपेक्षा जास्त वेळ लागेल. डीजीपी पंजाब पोलिसांकडून आवश्यक सुरक्षा व्यवस्थेची पुष्टी केल्यानंतर पंतप्रधान रस्त्याने प्रवास करण्यास निघाले. हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकापासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर, जेव्हा पंतप्रधानांचा ताफा उड्डाणपुलावर पोहोचला तेव्हा काही आंदोलकांनी रस्ता अडवला असल्याचे दिसून आले. पंतप्रधान 15-20 मिनिटे फ्लायओव्हरवर अडकले होते. पंतप्रधानांच्या सुरक्षेतील ही मोठी चूक होती. पंतप्रधानांचे वेळापत्रक आणि प्रवासाची योजना पंजाब सरकारला आधीच कळवण्यात आली होती. प्रक्रियेनुसार, त्यांना रसद, सुरक्षेसाठी आवश्यक व्यवस्था करावी लागेल तसेच आकस्मिक योजना तयार ठेवावी लागेल. तसेच आकस्मिक योजना लक्षात घेता पंजाब सरकारला रस्त्याने कोणतीही हालचाल सुरक्षित ठेवण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा तैनात करावी लागेल, जी स्पष्टपणे तैनात केलेली नव्हती. या सुरक्षेतील त्रुटींनंतर पुन्हा भटिंडा विमानतळाकडे जाण्याचा निर्णय घेण्यात आला. या गंभीर सुरक्षेतील त्रुटींची दखल घेत गृह मंत्रालयाने राज्य सरकारकडून सविस्तर अहवाल मागवला आहे. राज्य सरकारलाही या चुकांची जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करण्यास सांगितले आहे.
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या