अजित पवारांवर सिंचन घोटाळ्याची 'टांगती तलवार' - चंद्रकांत पाटील

गेली चार वर्ष अनेकदा कारवाईंसंदर्भात वक्तव्य भाजप नेत्यांकडून करण्यात आलं होतं. मात्र केवळ राजकीय कारणांसाठी याचा वापर होत असल्याची टीका होत आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 1, 2019 11:11 PM IST

अजित पवारांवर सिंचन घोटाळ्याची 'टांगती तलवार' - चंद्रकांत पाटील

मुंबई, 1 एप्रिल : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या डोक्यावरची सिंचन घोटाळ्याची टांगती तलवार कायम आहे. सिंचन घोटाळ्याची केस कोर्टात असून त्याचा कधीही निकाल येऊ शकतो असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलंय. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर सिंचन घोटाळ्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आणून अजित पवारांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरु असल्याची राजकीय वर्तुळात  बोललं जातेय. 2014 च्या निवडणुकीत भाजपनं राष्ट्रवादी काँग्रसेच्या नेत्यांविरोधात सिंचन घोटाळ्यावरून आरोपांची राळ उठवली. त्यात अजित पवार यांची चौकशी होऊन केस कोर्टात सुरु आहे.

गेली चार वर्ष अनेकदा कारवाईंसंदर्भात वक्तव्य भाजप नेत्यांकडून करण्यात आलं होतं. मात्र केवळ राजकीय कारणांसाठी याचा वापर होत असल्याची टीका होत आहे.

नरेंद्र मोदींची पवारांवर टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ध्यातल्या जाहीर सभेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर बोचरी टीका केली. या टीकेनंतर राष्ट्रवादीच्या सर्वच दिग्गज नेत्यांनी नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केलाय. पराभव दिसत असल्यानेच मोदींनी पवारांवर टीका केली असा पलटवार राष्ट्रवादींच्या नेत्यांनी केला आहे. मोदींच्या या टीकेनंतर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले होते मोदी?

Loading...

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना देशात कोणाची हवा आहे हे कळते. त्यामुळेच त्यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याचा घणाघाती आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्धा येथील सभेत केली. मोदींनी महायुतीच्या प्रचाराचा नारळ वर्धा येथून केला. यावेळी त्यांनी राज्यातील काँग्रेस ऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसवर अधिक टीका केली.

पवारांची माघार

राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार हे देशातील वरिष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. ते कोणताही कृती विचार पूर्ण विचार केल्याशिवाय करत नाहीत असे बोलले जाते. काही दिवसांपूर्वी त्यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याचे जाहीर केले. देशातील हवा कोणत्या दिशिने वाहते हे पवारांना चांगले माहित आहे. त्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतल्याचे मोदींनी सांगितले. इतक नव्हे तर सध्या त्यांच्या पक्षात कौटुंबिक लढाई सुरु आहे. कोणत्या मतदारसंघातून लढायचे आणि कोणत्या मतदारसंघातून लढायचे नाही हेच त्यांना कळत नाही. त्यामुळे अनेक नेते निवडणुकीतून पळ काढत आहेत. अशातच शरद पवारांचे पुतणे पक्षावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याची जहरी टीका मोदींनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 1, 2019 11:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...