खडसे आणि पंकजा मुंडे यांच्या भाजप सोडण्याच्या चर्चेवर चंद्रकांत पाटलांचं उत्तर

खडसे आणि पंकजा मुंडे यांच्या भाजप सोडण्याच्या चर्चेवर चंद्रकांत पाटलांचं उत्तर

भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री चंद्रकात पाटील यांनी उत्तर दिलं आहे.

  • Share this:

मुंबई, 11 डिसेंबर : एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे भाजपला धक्का देत दुसऱ्या पक्षात जाण्याचा चर्चा जोर धरू लागल्या आहेत. याबाबत आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री चंद्रकात पाटील यांनी उत्तर दिलं आहे. 'पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांची नाराजी ऐकून घेतली. दोघेही पक्ष सोडणार नाहीत,' असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

'पंकजा मुंडेंना भाजपचेच बाळकडू मिळालं आहे. त्या भाजप सोडणार या माध्यमांनी तयार केलेल्या बातम्या आहेत. स्वत: पंकजा यांना मीडियामधील बातम्यांचा त्रास होत आहे. उद्या गोपीनाथ गडावर मला निमंत्रण आहे. मी देखील तिथल्या मेळाव्याला जाणार आहे. नाथाभाऊ यांनीही पक्ष वाढवण्यात मोठं योगदान दिलं आहे. त्यामुळे दोघेही पक्ष सोडणार नाहीत,' असा खुलासा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

भाजपमध्ये पडणार मोठी फूट? 24 तासांत चित्र होणार स्पष्ट

युतीबाबत चंद्रकांत पाटील अजून 'प्रचंड आशावादी'

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून शिवसेनेनं भाजपसोबत फारकत घेतली. तसंच नंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मदतीने सरकारही स्थापन केलं. मात्र असं असलं तरीही भाजपचे नेते मात्र अजूनही शिवसेनेसोबत भविष्यात युती करण्याबाबत आशावादी असल्याचं दिसत आहे.

तुम्ही नाराज आहात का असा प्रश्न विचारल्यावर पंकजा मुंडेंचं सूचक विधान, म्हणाल्या...!

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी भाजप आणि शिवसेनेनं भविष्यात एकत्र यावं, असं म्हटलं होतं. त्यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, 'आम्ही आशावादी आहोत. भाजप आणि शिवसेना हे नैसर्गिक मित्र आहेत. आम्हाला अहंकार नाही.' चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यानंतर भाजप अजूनही शिवसेनेसोबत युती करण्यास उत्सुक आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 11, 2019 01:53 PM IST

ताज्या बातम्या