मेगाभरतीत भाजपमध्ये आलेल्या 'त्या' नेत्यांबद्दल चंद्रकांत पाटलांनी केला 'हा' दावा

चंद्रकांत पाटील यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षात आलेल्या लोकांबद्दलही भाष्य केलं आहे.

  • Share this:

मुंबई, 15 नोव्हेंबर : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी पत्रकार परिषद घेत भाजपच्या अंतर्गत बैठकीबद्दल माहिती दिली आहे. या बैठकीत विधानसभा निवडणुकीत भाजपने केलेल्या कामगिरीवर चर्चा झाल्यांचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. 'तसंच संख्याबळात आमचा 119 चा आकडा आहे. आमच्याशिवाय सरकार शक्य नाही', असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. तसंच त्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षात आलेल्या लोकांबद्दलही भाष्य केलं आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजपने केलेल्या मेगाभरतीची मोठी चर्चा झाली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते अनेक मोठे नेते तेव्हा सत्तेच असलेल्या भाजपमध्ये दाखल झाले होते. त्यामुळे भाजपला या निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळेल असाही दावा करण्यात आला. मात्र प्रत्यक्ष निवडणुकीत भाजपला अपेक्षापेक्षा कमी जागा आल्या. त्यामुळे भाजपची ही मेगाभरती फसली का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. यावरच चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिलं आहे.

'आमच्या पक्षातील 26 उमेदवार बाहेरुन आलेले होते. त्यातले 16 उमेदवार जिंकून आले आहेत. त्यामुळे बाहेरून आलेले सर्व पडले हा दावा चुकीचा आहे. आमच्या 164 लढून 105 जागा भाजपच्या निवडून आल्या. 12 महिला भाजप आमदार जिंकून आल्या. तसंच राज्यभरात भाजपला 1 कोटी 42 लाख मतं मिळाली आहेत,' असं स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे.

दरम्यान, आज मुंबई भाजपच्या वसंत स्मृती या दादर इथल्या कार्यालयात भाजपचे जिल्हाध्यक्ष, संघटन मंत्री तसेच इतर पदाधिकारी यांची बैठक झाली. काल भाजपचे विधानसभा निवडणुकीत निवडून आलेले आमदार , विधानपरिषदेचे आमदार यांची पक्षाचे विधिमंडळ नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली होती. उद्याही या बैठकांचे सत्र सुरू असणार असून विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांची बैठक होणार आहे. काल झालेल्या बैठकीत राज्यात पुन्हा एकदा भाजपसरकार येईल असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त करत आमदारांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी प्रयत्न केला होता. येत्या काळात भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका होणार असून त्याविषयी आज पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले गेले.

राज्यातल्या सत्ता संघर्षावर हे मीम्स तुम्ही पाहिलेत का? पाहा हा VIDEO

First published: November 15, 2019, 4:37 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading