संजय राऊतांना इतरांनी केलेली टीका लगेच टोचते, चंद्रकांत पाटलांचा सेनेवर पलटवार

संजय राऊतांना इतरांनी केलेली टीका लगेच टोचते, चंद्रकांत पाटलांचा सेनेवर पलटवार

  • Share this:

पुणे, 31 ऑक्टोबर: भाजपवर टीका करणं, ही शिवसेना खासदार संजय राऊत यांची ड्युटी आहे. त्यावरच त्यांचं पद आहे. मात्र, इतरांनी टीका केलेली त्यांनी चालत नाही, त्यांना लगेच टोचतं, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर पलटवार केला आहे.

चंद्रकांत पाटील पुण्यात बोलत असताना त्यांनी संजय राऊतांवर तोंडसुख घेतलं. ते म्हणाले, शरद पवारांचा सल्ला मुख्यमंत्री घेतात, हे संजय राऊतांनी मान्य केलं आहे. आम्हाला काय त्यांनी पार्थ पवारांचाही सल्ला घ्यावा, म्हणजे पवार सरकार चालवतात हे शिवसेनेनं मान्य केलं, असा सणसणीत टोला देखील चंद्रकांत पाटील यांनी यावेळी लगावला.

हेही वाचा...भाजप कार्यालयात राडा, कार्यकर्त्याकडून गिरीश महाजनांना शिवीगाळ

महाविकास आघाडी सरकारला 'शून्य' मार्क

महाविकास आघाडी सरकारला सत्तेत येऊन एक वर्षे पूर्ण होत असताना मी 'शून्य' मार्क देईन. कोरोनाच्या काळासरकारनं काय काम केलं केलं? हा प्रश्न तर सगळ्यांनाच पडला आहे. राज्यातील अनेक प्रश्न प्रलंबित आहे. त्यामुळे पूर्ण राज्य सरकार अज्ञात चालवतात, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.

मराठा आरक्षणवर काहीही बोलतात, तज्ज्ञांची मते घ्यायला हवीत. त्यामुळे हे सरकार उर्वरित काळात उत्तम चालेल का नाही, असं लोकांना विचारा, अशी टिप्पणी पाटलांनी यावेळी केली.

दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत आपल्या शैलीत चौफेर फटकेबाजी केली. यावेळी पत्रकारांनी पंकजा मुंडे यांच्या शिवसेनेच्या प्रवेशाच्या चर्चेबद्दल विचारले असता संजय राऊत म्हणाले की, 'पंकजा मुंडे या भाजपच्या चांगल्या नेत्या आहे. त्यांच्याशी चांगले संबंध आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांना जर पक्षात घ्यायचे असेल तर त्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ऑफर देतील.'

'सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे. पण काही लोकांना वाटत होतं की, हे सरकार 15 दिवसात कोसळेल. पणहे सरकार पूर्ण ताकदीने चाललेलं आहे. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची लढाई यशस्वीपणे सांभाळली आहे, असं ही राऊत म्हणाले.

'शरद पवार सरकार चालवतात हा आरोप चुकीचा आहे. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहे. ते महाविकास आघाडी सरकारला वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात. ते वरिष्ठ नेते असल्यामुळे सरकारला सल्ला देतात. आता याबद्दल चंद्रकांत पाटलांनी वाईट वाटून घेण्याचं कारण नाही. कदाचित मोदी आजही पवारांचे मार्गदर्शन घेत असतील', असं म्हणत राऊत यांनी सणसणीत टोला लगावला.

तसंच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्याचे प्रमुख असताना राज्यपालांना भेटणं योग्य नाही, असं म्हणत संजय राऊत यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा उल्लेख न करता टोला लगावला.

हेही वाचा... तुम्ही घातलेला 'सरकारमान्य' N95 मास्क बनावट! मुंबईत मोठा काळाबाजार उघडकीस

'आघाडी सरकारसमोर विरोधी पक्षाकडून आव्हानं निर्माण केली जात आहेत. केंद्र सरकारला वाटतं विरोधी पक्ष राहूच नये, आमचं मात्र तसं नाही. आम्ही विरोधकांचे नेहमीच स्वागत करतो', असं म्हणत राऊत यांनी भाजपला कोपरखळी लगावली.

' आज बिहारमध्ये तेजस्वी यादव हिंमतीने लढतोय, लाखोंच्या सभा घेतोय. उद्या बिहारमध्ये तेजस्वी यादव मुख्यमंत्री झाले तर आश्चर्य वाटणार नाही, असंही राऊत म्हणाले.

Published by: Sandip Parolekar
First published: October 31, 2020, 4:04 PM IST

ताज्या बातम्या