Home /News /maharashtra /

शरद पवार राज्य चालवतात, उद्धवांना बोलून काही उपयोग नाही, चंद्रकांतदादांचा टोला

शरद पवार राज्य चालवतात, उद्धवांना बोलून काही उपयोग नाही, चंद्रकांतदादांचा टोला

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankja munde) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचं केलेलं कौतुक म्हणजे महाराष्ट्राची संस्कृती आहे

सांगली, 29 ऑक्टोबर: भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankja munde) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचं केलेलं कौतुक म्हणजे महाराष्ट्राची संस्कृती आहे, कारण ते बाहेर पडतात पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav thackeray)हे घराबाहेर पडत नाहीत, अशी प्रतिक्रिया देत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. शरद पवार हेच राज्य चालवतात. उद्धव ठाकरे यांना बोलून काही उपयोग नाही, अशी खोचक टीका देखील चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. हेही वाचा...देवेंद्र फडणवीस यांनी केलेला घोटाळ्याचा आरोप राजेश टोपेंनी फेटाळला, दिलं उत्तर चंद्रकांत पाटील यांनी सांगलीत पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj thackeray) यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. दूध उत्पादक शेतकऱ्यांना दरवाढ आणि वाढीव वीज बिलाचा मुद्दा राज ठाकरे यांनी उपस्थित केला. पण याबाबत राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्याशी बोलावे, असा सल्ला राज्यपालांनी दिला आहे. यावरूम शरद पवार हेच राज्य चालवतात, हे स्पष्ट होते. शरद पवार घराबाहेर पडतात, उद्धव ठाकरे यांनी बोलून काही उपयोग नाही, असा सणसणीत टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्य सरकारनं आता एक एक गोष्ट उघडण्यासाठी काम करायला हवं. गर्दी टाळण्यासाठी आरखाडा तयार केला पाहिजे. मंदिरात गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ऑनलाइन प्रवेश द्यावा, असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी लगावला. दरम्यान, राज ठाकरे यांनी राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना दरवाढ आणि वाढीव वीज बिलाच्या प्रश्नी राज्यपालांची भेट घेतली असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले आहे. तसंच, राज्यपालांकडून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी बोलण्याचा सल्ला देण्यात आल्याचे राज ठाकरेंनी सांगितले, यावरून चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. राज ठाकरे यांनी आज सकाळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवनावर जाऊन भेट घेतली.‌ 'लॉकडाऊनच्या काळात लोकांना भरमसाठ वीज बिल देण्यात आले आहे. याबद्दल आम्ही राज्य सरकारशी बोललो. पण, त्यावर अजूनही कोणताही तोडगा निघाला नाही. म्हणून राज्यपालांशी बोलण्यासाठी आलो', असं राज यांनी स्पष्ट केले. हेही वाचा...Maratha reservation update: सुनावणी आता सुप्रीम कोर्टाच्या मोठ्या खंडपीठासमोर 'वाढीव वीज बिलासंदर्भात राज्यपालांशी चर्चा केली. लवकरच वाढीव वीज बिलाबाबत शरद पवारांशी चर्चा करणार आहे. लवकरात लवकर लोकांना दिलासा द्यावा अशी आमची मागणी आहे, राज्यपालांकडूनही शरद पवारांशी बोलणाच्या सल्ला देण्यात आला आहे, असंही राज ठाकरे यांनी सांगितले. 'एका छोट्याशा विषयाला इतका वेळ लावण्यात आला आहे. कळतं नाही नेमकं काय अडकलं आहे. त्यामुळे या विषयावर लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याशी बोलणार आहे', असंही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Chandrakant patil, Raj Thackeray, Sharad pawar, Udhav thackarey

पुढील बातम्या