मुंबई, 14 जानेवारी : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर नाट्यमय घडामोडी झाल्या आणि राज्यात सत्तापालट झाला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मदतीने उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र असं असलं तरीही हे सरकार कधीही कोसळू शकतं, असा दावा राज्यातील भाजप नेत्यांकडून सातत्याने करण्यात येत आहे. त्यातच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री चंद्रकात पाटील यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर खळबळजनक विधान करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
'शरद पवार यांना आजपर्यंत कधीही 100 पेक्षा जास्त आमदार निवडून आणता आलेले नाहीत. आपण मात्र सलग दोन वेळा ही कामगिरी केली आहे. रात्रीचा अंधार दिवस दूर होऊन दिवस येत असतो, तसंच राज्यात पुन्हा भाजपचं सरकार येणार,' असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
उद्धव ठाकरेंचे विश्वासू मंत्रीच नाराज, महाविकास आघाडीत धोक्याची घंटा'...तरीही निर्णय मात्र शरद पवारच घेतात'
महाविकास आघाडीतील निर्णय प्रक्रिया आणि सरकारचं खातेवाटप या मुद्द्यांवरून चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला खोचक टोला लगावला आहे. 'मुख्यमंत्री जरी उद्धव ठाकरे असले तरीही निर्णय मात्र शरद पवारच घेतात,' असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला चुचकारण्याचा प्रयत्न केला आहे. तसंच खातेवाटपात सगळी महत्त्वाची खाती राष्ट्रवादीकडे गेली असल्याचा हल्लाबोल केला आहे.
उद्धव ठाकरे टार्गेट
सर्वाधिक जागा मिळूनही सत्तेबाहेर राहावं लागल्याची सल भाजप नेत्यांच्या मनात अजूनही असल्याचं दिसत आहे. कारण याच मुद्द्यावरून चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं आहे. 'शिवसेना निवडणूक युतीत लढली. मतं मोदींच्या नावाने मागितली आणि सत्ता स्थापन करताना मात्र विरोधकांसोबत गेली,' अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.