'माझ्या फटक्याचे तुम्ही इतके अनुभव घेतले की...', शरद पवारांवर खरमरीत टीका

'माझ्या फटक्याचे तुम्ही इतके अनुभव घेतले की...', शरद पवारांवर खरमरीत टीका

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली आहे.

  • Share this:

कोल्हापूर, 11 ऑक्टोबर : 'शरद पवारांना पाटील अजून ओळखण्यात आला नाही. त्यांनी मला कोथरूडला अडकवून ठेवण्यात यश आल्याचं म्हणत बसू नये. चेहऱ्यावरून आणि देहबोलीवरून माझ्या डोक्यात काय सुरू हे तुम्हाला कळणार नाही. माझ्या फटक्याचे तुम्ही इतके अनुभव घेतले आहेत की त्यांच्यात आता उत्साह राहिला नाही,' असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली आहे.

कोल्हापुरात शिवसेनेचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारावेळी चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली. त्याचवेळी शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला. चंद्रकांत पाटील यांच्या या घणाघाती टीकेला राष्ट्रवादी काय उत्तर देणार, हे पाहावं लागेल.

'...तर पक्षातून हकालपट्टी करणार'

विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती झाल्यानंतर अनेक मतदारसंघात बंडखोरांनी डोकं वर काढलं आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांची डोकेदुखी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरमधील कार्यकर्त्यांना दम भरला आहे. 'युती धर्म तोडणाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येईल,' असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिला आहे.

अजित पवारांनी केली होती टीका

राष्ट्रवादीवर टीका करण्याची एकही संधी न सोडणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांनी चांगलाच समाचार घेतला. जसं अ.प. म्हणजे अजित पवार तसं चंपा म्हणजे चंद्रकांत पाटील असं म्हणत अजित पवारांनी टीका केली होती.

जाणिवा नसलेली लोकं म्हणजे जिवंत प्रेत? राज ठाकरेंचं गोरेगावमधील UNCUT भाषण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 11, 2019 04:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading