मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /पत्रकारांनी प्रश्न विचारताच चंद्रकांत पाटील म्हणाले कोण संजय राऊत?

पत्रकारांनी प्रश्न विचारताच चंद्रकांत पाटील म्हणाले कोण संजय राऊत?

उद्धव ठाकरेंना 'उठा' आणि शरद पवार यांना 'शपा' असं म्हणणार का?

उद्धव ठाकरेंना 'उठा' आणि शरद पवार यांना 'शपा' असं म्हणणार का?

उद्धव ठाकरेंना 'उठा' आणि शरद पवार यांना 'शपा' असं म्हणणार का?

शिर्डी, 17 डिसेंबर: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP Leader Chandrakant Patil) गुरुवारी साईदर्शनासाठी शिर्डीत (Sai baba Shirdi) साईदरबारी आले. यावेळी त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांच्यावर चांगलंच तोंडसुख घेतलं. पत्रकारांनी प्रश्न विचारताच कोण संजय राऊत? असा उपरोधिक सवाल करत चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांची चांगलीच खिल्ली उडवली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेवर देशाचा कारभार उत्तम सुरू आहे आणि पुढेही सुरू राहिल. हे सर्व तुम्हांला मान्य नाही का? असा सवाल देखीव चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना उद्देशून यावेळी उपस्थित केला.

हेही वाचा...पुण्यात अधिकाऱ्याचा राजीनामा, डॅमेज कंट्रोल करण्यासाठी शरद पवार थेट साताऱ्यात

शिर्डीत साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोण संजय राऊत? असा पत्रकारांनीच प्रतिसवाल करत टर्र उडवली. ते म्हणाले, एकीकडे डॉ. बाबासाहेबांच्या घटनेला मानायचं, आणि दुसरीकडे विरोध करायचा. राज्यघटनेच्या चौकटीतील गोष्टी मानाव्या लागतील. एकाद्या घटनेसंदर्भात न्यायालयात जा‌यचं नाही का? न्यायालनाने निर्णय द्यायचा नाही मग काय यांची दादागिरी चालणार का? असा सवाल केला. यांना निवडणूक आयोग, कोर्टाचा निर्णय मान्य नाही, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला उद्देशून यावेळी लगावला.

तुम्ही सरकार चालवा आम्ही विरोधी पक्ष सांभाळू....

राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार भाजपचे अनेक आमदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याचा गौप्यस्फोट केला होता. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी सडकून टीका केली. ते म्हणाले, अजित पवारांमध्ये एवढी ताकद असती तर राज्यात 80 तासांचं सरकार आलं त्यावेळी त्यांनी आणलेले आमदार का नाही टिकवले. ते आमदार अजित पवारांना टिकवता आले असते तर सरकार राहिलं असतं, अशा शब्दात समाचार घेतला. तुमचं आघाडी सरकार उत्तम चाललंय... का आमच्या लोकांना आकर्षित करता,असा उपहासात्मक टोलाही लगावला.

अजितदादा खूप ‌चांगले नेते , चांगल काम करतात. गंमत निर्माण होईल, असं बोललं तर त्यांची प्रतिष्ठा कमी होईल, असंही त चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं. तुम्ही सरकार चालवा, आम्ही विरोधी पक्ष सांभाळू. अन्यथा तुम्हाला जे करायच ते करा, असा खोचक सल्ला देखील द्यायला चंद्रकांतदादा मागे थांबले नाहीत.

शिवसेना संपत चालली आहे....

निवडणुका असू दे किंवा निर्णय असू देत शिवसेना स्वत: चे प्रचंड नुकसान करून घेत आहे. पण मी अस‌ं काही म्हटलं की संजय राऊत यांना सत्तेशिवाय झोप ‌‌येत नाही, तर ते लगेच अग्रलेख लिहणार, असा सणसणीत टोला चंद्रकांतदादांनी यावेळी लगावला. आम्हाला उत्तम झोप लागते...आम्हाला काय फरक पडत नाही. मात्र आता शिवसेना संपत चालली आहे, अशीही टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.

सत्तेत असूनही शिवसेनेचं नुकसान...

राज्यात होऊ घातलेल्या आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात भाजप पूर्ण ताकदीनं उतणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे. 1+1+1 असं तीनच होणार, दोन होणार नाही. त्यामुळे तीन पक्ष एकत्र आल्यावर त्यांची ताकद जास्तच असणार. तीन जण एकत्र आल्यावर मतांचे एकत्रीकरण होणारच. ग्रामपंचायत निवडणुकीत सुद्धा महाविकास आघाडीचा असा प्रयत्न राहील. मात्र आम्ही सुद्धा पूर्ण ताकदीनं निवडणुका लढवणार आहे, असंही त्यांनी दावा केला. शिवसेनासोबत नसल्याने आमचं नुकसान होत आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी मान्य केलं आहे. मात्र, शिवसेना सत्तेत असताना त्यांचंही मोठं नुकसान होत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

हेही वाचा...प्रताप सरनाईकांचे ACBला पत्र, भाजप नेत्यासह नगरसेवकावर केला भ्रष्टाचाराचा आरोप

उद्धव ठाकरेंना 'उठा' आणि शरद पवार यांना 'शपा' असं म्हणणार का?

चंद्रकांतदादा म्हणाले, मला चंपा बोललं जातं मात्र आम्ही त्यास‌ उत्तर देत नाही. मुख्यमंत्री यांना उठा आणि शरद पवार यांना शपा असं म्हणणार का? ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. निवडणूक संपल्यावर पाच वर्षे एकत्र काम करावं. मात्र, गेल्या वर्षात सरकार वाचवण्यासाठी विरोधकांना टार्गेट केलं जात आहे. अशा पद्धतीनं राग मनात धरून सरकार चालत नाही, असंही मत चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केलं...

First published:

Tags: Chandrakant patil, Sanjay raut