कोरोना काळात मुख्यमंत्री साहाय्यता निधीचा वापर झालाच नाही; चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट

कोरोना काळात मुख्यमंत्री साहाय्यता निधीचा वापर झालाच नाही; चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट

चंद्रकांत पाटील यांनी 'अकार्यक्षमतेचा कहर' असं ट्वीट करून राज्य सरकारवर गंभीर आरोप केले

  • Share this:

मुंबई, 31 ऑगस्ट: कोरोना महामारीच्या काळात केंद्र सरकारनं वेगवेगळ्या माध्यमातून जनतेला मोठ्या प्रमाणात मदतकार्य केले. तसेच अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या. यामध्ये पीएम केअर फंडमुळे देशभरातील अनेक लोकांना आधार मिळाला. एकीकडे पीएम केअर फंडच्या माध्यमातून लोकांना सतत मदत केली जात आहे, तर दुसरीकडे महाराष्ट्रात राज्य शासनाच्या 'मुख्यमंत्री साहाय्यता निधी'चा अद्यापही वापर झालाच नसल्याची गौप्यस्फोट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. मुख्यमंत्री साहाय्यता निधीचा वापर न करता राज्य सरकार जनतेच्या जीवाशी खेळत आहे, असा घणाघाती आरोप चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

हेही वाचा....कोरोनाच्या ब्रेकनंतर राज ठाकरे अॅक्टिव्ह! औरंगाबादेत शिवसेनेला दिला 'दे-धक्का'

चंद्रकांत पाटील यांनी 'अकार्यक्षमतेचा कहर' असं ट्वीट करून राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळापासूनच मुख्यमंत्र्यांनी आम्ही इतक्या चाचण्या केल्या. आम्ही हे सर्वप्रथम केलं. आम्हीच या गोष्टी उपलब्ध करून दिल्या, असा कांगावा केला होता. मात्र, सध्या राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना, मृत्युदर वाढत असताना राज्य शासनाचा अपयशी कारभार निदर्शनास येत आहे. वैद्यकीय सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीमध्ये 550 कोटी रुपये जमा झाले होते. मात्र आतापर्यंत केवळ 132 कोटी 25 लाख रुपयांचा वापर करण्यात आला आहे, ही मदत सुद्धा केवळ स्थलांतरित मजुरांना केली गेली.

आज जेथे राज्यात नागपूर, पुणे, औरंगाबाद आणि अनेक शहरांमध्ये नागरिक कोरोनाच्या युद्धात लढताना कमजोर पडत आहेत. कारण त्यांच्याकडे निधीची कमतरता आहे. दुसरीकडे राज्यभरात गंभीर परिस्थिती उद्भवली असतानाही शासनाने या रक्कमेचा रुग्णांसाठी तसेच इतर सुविधा पुरवण्यासाठी वापर का केला नाही? ज्याठिकाणी जास्त गरज आहे, तिथे एक दमडीसुद्धा या साहाय्यता निधीमधून देण्यात आली नाही, जी फार लज्जास्पद बाब असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे.

हेही वाचा...आरोग्य विषयक आणीबाणीत कायदेभंगाची भाषा अयोग्य, संजय राऊतांचा आंबेडकरांना टोला

गेल्या 4 ते 5 महिन्यांत राज्य शासनाकडून या साहाय्यता निधीतून कोणत्या वैद्यकीय सुविधा पुरवण्यात आल्या, यावर शंका उपस्थित होते. या निधीतुन केवळ एका 16 कोटींच्या प्लाझ्मा थेरपीसाठी आणि 20 कोटी मुंबईतील एका रुग्णालयाला दिले गेले. सध्या महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक होत आहे, रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हे सर्व लक्षात घेता चाचण्या वाढवणं आणि बेड्सची निर्मिती करणं, व्हेंटिलेटर्स उपलब्ध करणं या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. मात्र, यादेखील शासनाकडून योग्यरित्या केल्या गेल्या नाहीत. करण्याची गोष्टदेखील दूर त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. वाळूजमध्ये एका कोरोना संशयित वृद्ध महिलेला झाडाखाली ऑक्सिजन सिलेंडर लावून बसवण्यात आलं होतं, इतकी वाईट परिस्थिती सध्या राज्यामध्ये आहे. हे सरकार जनतेची मदत न करता, त्यांची पर्वा न करता केवळ त्यांच्या जीवाशी खेळत आहे, जनता सर्व पाहत आहे, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: August 31, 2020, 7:13 PM IST

ताज्या बातम्या