Home /News /maharashtra /

गिरे फिर भी टांग उपर! चंद्रकांत पाटलांचा अशोक चव्हाण यांच्यावर हल्लाबोल

गिरे फिर भी टांग उपर! चंद्रकांत पाटलांचा अशोक चव्हाण यांच्यावर हल्लाबोल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे सल्लागार कोण आहे, त्यांना कोण असे सल्ले देतं हे माहिती नाही, अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांचा टोला

मुंबई, 10 सप्टेंबर: मराठा आरक्षणास (Maratha Reservation) सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली आहे. त्यावरून मराठा संघटना पुन्हा एकदा आक्रमक झाल्या आहेत. त्यात विरोधी पक्ष भाजपनं महाविकास आघाडी सरकारला याबाबत जबाबदार धरलं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर हल्लाबोल केला आहे. अशोक चव्हाण यांची परिस्थिती 'गिरे फिर भी टांग उपर' अशी आहे, अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली आहे. हेही वाचा...शिवसेनेला आणखी एक धक्का! महापौर किशोरी पेडणेकरांच्या विरोधात अविश्वास ठराव चंद्रकांत पाटील म्हणाले की, स्थगिती न मिळता घटनात्मक खंडपीठाकडे प्रकरण गेलं असतं तर हा सरकारचा नैतिक विजय झाला असता. मात्र, या प्रकरणी नैतिक विजय झाला असं म्हणणं हे चव्हाण यांचं वक्तव्य हास्यास्पद आहे, घटनामत्मक खंडपीठाकडे हे प्रकरण गेल्याने आता हा खटला 30 ते 40 वर्षे चालेल, असं देखील चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. मराठा आरक्षण प्रकरणात राज्य सरकारनं नेमलेल्या वकिलांमध्ये समन्वय नव्हता, असा गंभीर आरोप देखील चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. दुसरीकडे, बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत प्रकरणात देखील हे सरकार तोंडावर आपटलं आहे. कंगना प्रकरणात शरद पवारांनी काल शिवसेनेला कानपिचक्या दिल्या, असा दावा देखील चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे सल्लागार कोण आहे, त्यांना कोण असे सल्ले देतं हे माहिती नाही, अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावला आहे. हेही वाचा... शिवसेनेत खळबळ! आणखी एका आमदाराला कोरोनाची लागण, अधिवेशनालाही होते उपस्थित काय म्हणाले अशोक चव्हाण? मराठा आरक्षण प्रकरण पुढील सुनावणीसाठी घटनापीठाकडे गेले आहे. त्यावर कोणताही अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. त्यामुळे स्थगिती मिळाली, हा दावा योग्य नाही. परंतु, प्रकरण घटनापीठाकडे वर्ग करताना 2020-21 या शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रिया आणि नोकर भरतीमध्ये मराठा आरक्षण लागू न करण्याचा अंतरिम आदेश देणे अनाकलनीय आहे. सोमवारी सरन्यायाधीशांकडे अर्ज करून हा अंतरिम आदेश निरस्त करण्याची विनंती केली जाणार आहे, अशी माहिती मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली.
Published by:Sandip Parolekar
First published:

पुढील बातम्या