मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Chandrakant Patil : चंद्रकांत पाटलांनी केली निवृत्तीची घोषणा, म्हणाले...

Chandrakant Patil : चंद्रकांत पाटलांनी केली निवृत्तीची घोषणा, म्हणाले...

 मी देखील अजून दहा ते बारा वर्षेच काम करणार असल्याची माहिती राज्याचे उच्च तंत्रज्ञान शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हंटले आहे.

मी देखील अजून दहा ते बारा वर्षेच काम करणार असल्याची माहिती राज्याचे उच्च तंत्रज्ञान शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हंटले आहे.

मी देखील अजून दहा ते बारा वर्षेच काम करणार असल्याची माहिती राज्याचे उच्च तंत्रज्ञान शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हंटले आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India
  • Published by:  Sandeep Shirguppe

पुणे, 01 ऑक्टोबर : जन्माला येणारा प्रत्येकजण कधी ना कधी निवृत्त होतोच. आगामी काळ मुलींचा आहे, त्यामुळे त्यांना प्राधान्य दिले पाहिजे. मी देखील अजून दहा ते बारा वर्षेच काम करणार असल्याची माहिती राज्याचे उच्च तंत्रज्ञान शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हंटले आहे. दरम्यान त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सभागृहातच त्यांच्या निवृत्तीवर चर्चा रंगली होती. मंत्री पाटील हे एका शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमावेळी बोलत होते.

ते पुढे म्हणाले कि, समाजासाठी वेगवेगळ्या क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या संस्थेच्या विद्यार्थिनींचे आणि संस्थेचे अभिनंदन करून पाटील म्हणाले, महिला मोठ्या प्रमाणात सर्व क्षेत्रांत पुढे यायला लागल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात मुलींना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले पुढे म्हणाले कि, जन्माला येणारा प्रत्येकजण कधी ना कधी निवृत्त होतोच. आगामी काळ मुलींचा आहे, त्यामुळे त्यांना प्राधान्य दिले पाहिजे. मी देखील अजून दहा ते बारा वर्षेच काम करणार असल्याची माहिती राज्याचे उच्च तंत्रज्ञान शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हंटले आहे.

हे ही वाचा : 'अजित दादांना कामच काय उरलं? आता इंदुरीकर महाराजांची कीर्तनं..', शहाजीबापूंचा टोला

ते पुढे म्हणाले कि, पंतप्रधान मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 20 वर्षे पूर्ण झाल्यामुळे एक स्पर्धा घेण्यात आली. ज्यामध्ये पंतप्रधानांवर लघुपट निर्माण करायचा होता. त्यामध्ये जवळपास 135 लघुपट आले होते. त्याचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम नुकताच झाला. यातील पहिल्या आलेल्या लघुपटाचे नाव ‘दोन कप चहा’ असे होते.

हा लघुपट पंतप्रधान मोदी यांना दाखविण्यात आल्यानंतर त्यांच्या डोळ्यांत पाणी आले, असे पाटील यांनी सांगितले. महाविद्यालयात देखील दोन मुलींनी लघुपटाची निर्मिती केली. लघुपट माणसाच्या आयुष्याला वळण देते. त्यामुळे आम्ही दिलेल्या विषयावर जर तुम्ही लघुपट तयार करणार असाल, तर आर्थिक साहाय्य देण्याचा शब्द देखील पाटील यांनी दिला.

चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर एकनाथ खडसेंची टीका

भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी पाच ते दहा वर्षानंतर निवृत्ती घेणार असल्याचं वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यावरुन राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी चंद्रकांत पाटलांना जोरदार टोला लगावला आहे. 'पाच दहा वर्षानंतर कशाला? आताच निवृत्ती घ्या' या शब्दात एकनाथ खडसेंनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टोलेबाजी केली आहे.

हे ही वाचा : थापा आला, आता आणखी एक 'खास माणूस' येतोय, गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याने उद्धव ठाकरेंना धक्का

खडसे यांनी म्हटलं आहे की, चंद्रकांत पाटील यांचा पिंड राजकारणी नाही. ते विद्यार्थी परिषदेचं काम करत होते. त्यांचा राजकारणाशी फारसा संबंध नव्हता. गेल्या काळात पक्षाने त्यांच्यावर मोठमोठ्या जबाबदाऱ्या दिल्या. मात्र आता पक्षातल वातावरण त्यांना आवडलं नसावं आणि अशा वातावरणात पुढच्या काळात राजकारण अवघड आहे, असे त्यांच्या मनाला वाटलं असेल, त्यामुळे राजकारणापासून वेगळं होण्याचा विचार त्यांच्या मनात आला असेल, असं एकनाथ खडसेंनी म्हटलं आहे.

First published:

Tags: Chandrakant patil, Eknath khadse, Pune (City/Town/Village)