मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

खंजीर कुणी खुपसला? त्यांचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही, भाजप नेत्याची सेनेवर जळजळीत टीका

खंजीर कुणी खुपसला? त्यांचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही, भाजप नेत्याची सेनेवर जळजळीत टीका

त्यांच्या जागा आमच्या भरवश्यावर निवडून आणल्या. सरकार बनवताना मात्र 'मातोश्री'चे दरवाजे लावून घेतले.

त्यांच्या जागा आमच्या भरवश्यावर निवडून आणल्या. सरकार बनवताना मात्र 'मातोश्री'चे दरवाजे लावून घेतले.

त्यांच्या जागा आमच्या भरवश्यावर निवडून आणल्या. सरकार बनवताना मात्र 'मातोश्री'चे दरवाजे लावून घेतले.

शिर्डी, 24 जुलै :  'उद्धव ठाकरेच (uddhav thackery) भाषण करत होते की भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) होतील, मग खंजीर कुणी खुपसला? तुम्ही का आडवे आले? इतिहास साक्षी आहे ज्यांनी असे खंजीर खुपसले त्यांचा सत्यानाश झाल्याशिवाय राहत नाही. लपवाछपवीचा खेळ जास्त दिवस चालत नाही. 2024 ला पुर्ण बहुमताने भाजपाचे सरकार येईल' अशी घणाघाती टीका भाजपचे नेते आणि माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule) यांनी केली.

भारतीय जनता पार्टीच्या युवा वॉरियर्स (Young Warriors BJP) या नवीन मोहिमे अंतर्गत संघटन वाढवण्यासाठी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे नगर जिल्हयाच्या दौऱ्यावर आहेत. २५ लाख युवकांना या मोहिमेत जोडणार असल्याचं बावनकुळे यांनी ‌संगमनेर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलंय. या वेळी बावनकुळे यांनी राज्य सरकारवर चौफेर हल्ला चढवला.

गोव्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या प्रवासी ट्रेनवर दरड कोसळली; भयावह दुर्घटना

'शिवसेनेने भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसला. निवडणुका आमच्या भरवशावर लढवल्या आणि त्यांच्या जागा आमच्या भरवश्यावर निवडून आणल्या. सरकार बनवताना मात्र 'मातोश्री'चे दरवाजे लावून घेतले. त्यांचे दरवाजे त्यांच्या मर्जीनेच उघडतात. शिवसेनेने काँग्रेस,  राष्ट्रवादी बरोबर आघाडी केली. त्यांचे अगोदरच ठरलेलं होते. आम्ही इमानदारीने राहिलो त्यांनी मात्र खंजीर खुपसला, अशी टीका बावनकुळे यांनी सेनेवर केली.

'मराठा आणि ओबीसी आरक्षणा संदर्भात राज्य सरकार गंभीर नसून डिसेंबर 2022 पर्यंत राज्य सरकारला आरक्षण द्यायची इच्छा नाही. त्यामुळे केंद्र सरकारवर ढकलण्याचं काम राज्य सरकारकडून सुरू आहे. युपीए सरकारच्या काळात झालेल्या चुकीच्या जनगणेमुळे ही अडचण निर्माण झालीय. ओबीसी डेटा गोळा करायला तीन महिने खूप झाले. मराठा आरक्षणाच्या बाबतीत ही अशीच भूमिका असल्याचे बावनकुळे यांनी म्हटलंय.

सलमान खानच नाही तर 'या' सेलेब्सनी केलंय Bigg Boss होस्ट; आता करण जोहरही सज्ज

'ऊर्जा मंत्र्यांच्या घोषणेवर लक्ष देऊ नका. पहिली घोषणा 100 युनिट पर्यंत वीज बिल माफ ती ही फोल ठरली. सहा महिने वाट पाहिली तेव्हा कळलं की उपमुख्यमंत्री , मुख्यमंत्री ऊर्जा मंत्र्यांच्या फाईलवर सहीच करत नाही. कोकणाला 3500 कोटी दिले म्हणतात. मला वाटत सही केली तर होईल नाही तर याही घोषणेचा बोजवारा उडेल, अशी टीकाही बावनकुळे यांनी करताना कोकणला पैसे दिले असतील तर अभिनंदन करू , नाही तर पुन्हा पुतळे जाळायला सुरुवात करू, असा इशारा दिला.

'आज आमची परिस्थिती वेगळी आहे. आम्ही आमच्या मैदानात निघालोय. मनसे बरोबर युतीचा निर्णय योग्यवेळी प्रदेशाध्यक्ष करतील. हिंदुत्ववादी मतांचे विभाजन होऊन भाजपला फटका बसणार नाही. मात्र जनताच आता महाविकास आघाडीला फटका देण्याची वाट पाहत आहे. ग्रामीण भागात मी फिरतोय जनता झाडू घेऊन तयार आहे. आता हिंदुत्ववादी, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस सगळी मत आमच्याकडे आलीय आणि हे पंढरपूरच्या निवडणुकीत दिसून आलंय. त्यामुळे एकटे लढलो तरी फरक पडणार नाही. असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.

आई-बाबा, बहिण, बायको सगळेच दरडीखाली सापडले, तळीये गावाच्या जवानावर दुखाचा डोंगर

'पालकमंत्री मतदार संघापुरते आहे का? उपमुख्यमंत्री पुण्या पुरते आणि मुख्यमंत्री फक्त मुंबई पुरते आहे का? असा सवाल चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित करत राजकीय भाषणे बंद करून 12 कोटी जनतेसाठी काम करावे. रात्री उद्या काय बोलायचं याची लिस्ट तयार होते. कॉंग्रेसने काय बोलायचं, राष्ट्रवादीने काय बोलायचे हे ठरवल जातंय. संजय राऊत यांनी मान तिरकी करत काय बोलायचं हे देखील सगळं ठरवलं जाते. केवळ प्रसार माध्यमाचा स्पेस खाण्याचा हा प्रकार आहे, असा मिश्कील टोलाही बावनकुळे महाविकास आघाडीला लगावला.

First published: