राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांकडून भाजपच्या नेत्याला मारहाण, पिंपरी चिंचवडमध्ये घडला प्रकार

राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांकडून भाजपच्या नेत्याला मारहाण, पिंपरी चिंचवडमध्ये घडला प्रकार

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सत्ताधारी आणि विरोधक भिडले आहेत.

  • Share this:

पिंपरी चिंचवड, 1 जून : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सतत खटके उडत असतात. मात्र महापालिकेतील हा वाद आता थेट मारहाणीपर्यंत पोहोचल्याचं पाहायला मिळालं आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सत्ताधारी आणि विरोधक भिडले आहेत. शिवसेना गटनेते राहुल कलाटे आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक मयूर कलाटे यांनी भाजप नगरसेवक आणि माजी स्थाई समिती अध्यक्ष विलास मेडगिरी यांना मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.

महापालिकेमध्ये धनवंतरी योजनेबाबत विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तर देण्याऐवजी मेडगिरी अंगावर धावून आल्यामुळे नंतर त्यांना धक्काबुक्की झाल्याचं कलाटे यांचं म्हणणं आहे. तर मारहाणीमुळे BP हाय झाल्याने भाजप नगरसेवक मेडगिरी यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, या प्रकाराला काही तास लोटले तरीही संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. या संपूर्ण घटनेची शहरात चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. आधीच गुन्हेगारीमुळे पिंपरी चिंचवडच्या कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना आता तर थेट महापालिकेमध्येही हाणामारीचे प्रकार घडत असल्याने सर्वसामान्यांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

First published: June 1, 2020, 11:39 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading