टगेगिरी हीच महाभकास आघाडीतील मित्र पक्षांची संस्कृती, भाजपची जहरी टीका

टगेगिरी हीच महाभकास आघाडीतील मित्र पक्षांची संस्कृती, भाजपची जहरी टीका

'प्रशासकीय अधिकारी ऐकत नसतील आणि तुमचं कामं होतं नसतील तर दंगा करा'

  • Share this:

मुंबई, 9 ऑगस्ट: 'प्रशासकीय अधिकारी ऐकत नसतील आणि तुमचं कामं होतं नसतील तर दंगा करा' असा अजब सल्ला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिला आहे. एवढंच नाही तर शासकीय कार्यालयात जाताना सोबत चार-पाच जणांना घेऊन जा, असंही बाळासाहेब थोरात यांनी कार्यकर्त्यांना सल्ला दिला. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री महोदयांना आपल्या कार्यकर्त्यांना अजब सल्ला दिल्यानंतर भाजपनं घणाघाती टीका केली आहे.

हेही वाचा...घरात घुसून आई-वडील आणि बहिणीसमोर तरुणावर चाकूनं केले सपासप वार

महाराष्ट्रात अराजकता माजवण्याचा प्रयत्न आहे का? असा सवाल भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी काँग्रेसला केला आहे. 'टगेगिरी हीच महाभकास आघाडीतील मित्र पक्षांची संस्कृती आहे, अशा शब्दांत आमदार अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारला लगावला आहे. आमदार भातखळकर यांनी ट्वीट करून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

काय आहे बाळासाहेब थोरात यांचा अजब सल्ला...?

सोलापुरात कोरोनाविषयक आढावा बैठकीसाठी शनिवारी बाळासाहेब थोरात आणि यशोमती ठाकूर आल्या होत्या. त्याआधी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मंत्री महोदयांनी आपल्या कार्यकर्त्यांना हा अजब सल्ला दिला. प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे तक्रारी घेऊन गेल्यानंतर ते कामे होत नसल्याची तक्रार कार्यकर्त्यांनी केली. यावर उत्तर देताना मंत्री यशोमती ठाकूर यांनी हे वक्तव्य केलं.

कामं होत नसतील तर दंगा करा. भीक मागितलं तर कोणी देत नाही, अधिकार हिसकावून घ्यावे लागतात. कोणत्याही तालुका अध्यक्षाने अशी तक्रार करु नये. तुम्हाला तालुका अध्यक्ष केलं आहे, तुमचा तालुका तुम्ही सांभाळायला हवा. त्याला ताकद देण्याचं काम आम्ही करु, असं यशोमती ठाकूर यांनी सांगितलं. तर अधिकाऱ्यांवर आपला धाक असायला हवा. धाक निर्माण करण्याची गरज जनतेची, कार्यकर्त्याची असली पाहिजे. चुकीचं वागणाऱ्या अधिकाऱ्यावर आपला धाक असला पाहिजे. आपण कार्यकर्ते म्हणून जाताना जरा एकजुटीनं गेलं पाहिजे, दोन-चार पोरं या बाजूला, दोन-चार पोरं दुसऱ्या बाजूला घेऊन गेलं की सगळं व्यवस्थित चालतं' असा सल्ला बाळासाहेब थोरात यांनी दिला.

हेही वाचा...मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धाकट्या तेजसला वाढदिवसानिमित्त दिलं अनोखं गिफ्ट

मात्र, नंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बाळासाहेब थोरात यांनी आपल्या वक्तव्यावरून सारवासारव केली. काम करण्यासाठी पैसे घेणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर नैतिक धाक असायला हवा, अशा अर्थाने आपण वक्तव्य केल्याचं स्पष्टीकरण बाळासाहेब थोरात यांनी दिली.

Published by: Sandip Parolekar
First published: August 9, 2020, 8:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading