मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरीनंतर बदलला शेरा, भाजप नेत्याकडून 'फाईल घोटाळा' उघड केल्याचा दावा

राज्याच्या जनतेनं आजपर्यंत अनेक घोटाळे पाहिले आहेत. त्यापेक्षा अनोखा घोटाळा महाविकास आघाडी सरकारच्या काळात घडला आहे.

राज्याच्या जनतेनं आजपर्यंत अनेक घोटाळे पाहिले आहेत. त्यापेक्षा अनोखा घोटाळा महाविकास आघाडी सरकारच्या काळात घडला आहे.

  • Share this:
    मुंबई, 15 डिसेंबर: विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा (maharashtra winter assembly session 2020) आज आणि शेवटचा दिवस आहे. विधानसभेत पुरवणी मागण्यांवरून महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी पक्ष भाजपमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. पुरवणी मागण्यांवर बोलताना भाजपचे आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मंत्रालयातील एक गंभीर 'फाईल घोटाळा' उघड केल्याचा दावा केला आहे. आशिष शेलार यांनी सांगितलं की, राज्याच्या जनतेनं आजपर्यंत अनेक घोटाळे पाहिले आहेत. त्यापेक्षा अनोखा घोटाळा या आघाडी सरकारच्या काळात घडला आहे. हेही वाचा...अधिवेशनात चकमक, अजित पवार सुधीर मुनगंटीवारांवर भडकले तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या काळात सार्वजनिक बांधकाम विभागातील पवार नावाच्या अभियंत्यांचे चौकशीचे आदेश देण्यात आले होते. ती फाईल फिरत सचिव, मंत्री यांच्यापर्यंत आल्यावर चौकशीचे आदेश कायम ठेवण्यात आले पण ती फाईल मुख्यमंत्र्यांकडे गेल्यावर त्यावर लाल शाईने शेरा मारुन चौकशीची गरज नाही, असं सांगण्यात आलं. मात्र, त्यानंतर ही फाईल पुन्हा संबंधित मंत्र्यांकडे आल्यावर ही बाब निदर्शनास आल्यावर मुख्यमंत्र्यांनी आपला निर्णय बदलला. याबाबत मुख्यमंत्री आणि मंत्री यांच्यात चर्चा झाली. त्यावेळी आपण खालून आलेला निर्णय बदलेला नाही, असं सांगितलं. मग मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीनंतर या फाईलवर शेरा कुणी मारला? अशा पध्दतीने मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी झाल्यानंतर त्यावर शेरे मारले जात असतील तर या सरकारच्या काळातील सगळ्याच निर्णयाच्या फाईलची चौकशी करणे आवश्यक आहे, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली. गंभीर बाब म्हणजे या प्रकरणी एफआयआर दाखल करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यानंतर ही एफआयआर दाखल करण्यात आला नाही. चौकशी करु आणि एफआयआर दाखल करु असे अधिकाऱ्यांनी सांगितले. अशा पद्धतीने राज्य कारभार सुरु आहे, असा गंभीर आरोप करीत हा घोटाळा आमदार आशिष शेलार यांनी उघड केला असल्याचा दावा केला आहे. आमदार शेलार म्हणाले, कोरोनामुळे (Coronavirus) राज्यात मृतांचा आकडा 50 हजारांवर पोहोचला आहे. देशात सर्वात जास्त मृत्यू महाराष्ट्रात झाले. एवढंच नाही तर घाटकोपर येथील एक महिला गटारात पडते त्यांचा मृतदेह हाजी अली येथे सापडतो. आघाडी सरकारच्या काळात जे मृत्यूच्या घटना आणि सर्वत्र मृत्यू असं वातावरण आहे. ते पाहिले की लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी त्यावेळी इंग्रज सरकार विरोधात जो अग्रलेख लिहिला आणि म्हटले होते की, हे कसले सरकार हे तर आमच्या स्मशानाचे रखवालदार, या विधानाची आज आठवण होते, असे सांगत भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी सरकारचा खरपूस समाचार घेतला. आणखी काय म्हणाले आशिष शेलार? एकीकडे राज्य सरकारनं शासकीय कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड ठरवला आहे. ते कितीजण पाळतील, व्यक्ती स्वातंत्र्यावर घाळा घालणारे आहे का? हे येणाऱ्या काळात ठरेल. पण ज्या मंत्रालयातून हे आदेश निघाले त्याच मंत्रालयात काय सुरु आहे, तर राज्याच्या अतिरिक्त सचिवांवर कॅगनं गंभीर ताशेरे ओढले. या अतिरिक्त सचिवांनी तर संविधानाची शपथ घेतली त्याचा त्यांना विसर पडला आहे, असे सांगत कॅगनं या सचिवांनी कॅगच्या अहवालातील नोंदी बदलल्या, कँगच्या कामात अडथळा आणला, फेरफार केले, असे गंभीर ताशेरे कॅगनं ओढले. तसेच या सचिवांची सीबीआय, मुख्य सचिव, लोकायुक्तांमार्फत चौकशी व्हावी व केंद्र शासनाच्या डीओपीटीनं कारवाई करावी, अशी शिफारस केली. त्या सचिवांना आघाडी सरकारनं प्रमोशन दिले व त्यांच्याकडे वित्त आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचा कार्यभार दिला,  अशा पद्धतीनं राज्य चालवलं जात आहे. हेही वाचा...म्हणून रावसाहेब दानवे पत्रकार परिषदमधून उठून गेले, राजू शेट्टींची घणाघाती टीका दो गज अंतर, मास्क आणि सँनिटायझर हे...कोविड काळात महत्त्वाचे होते. त्याशिवाय दुसरा पर्याय ही नव्हता. अशा वेळी कोविड काळात कोट्यवधीचा भ्रष्टाचार करण्यात आला. मुंबई महापालिकेने ज्या कंपन्याकडून सँनिटायझर घेतले त्यापैकी अनेक कंपन्या या स्टेशनरी पुरवठादार, घरगुती साधनांची दुरुस्ती करणाऱ्या, वैद्यकीय अवजारे पुरवणारे असून यातील रेव्हणकर ट्रेंडर्स ही कंपनी ड्रम वाद्य तयार करणारी असून या कंपन्याना सँनिटायझर पुरविण्याचे काम देण्यात आले. या कंपनीचे संचालक रेव्हणकर हे मुंबईच्या महापौरांचे जावई आहेत. वरळीच्या कोविड सेंटरचे काम महपौरांच्या मुलाला देण्यात आले. अशा प्रकारे कोविड काळात भ्रष्टाचार करुन मुंबईकरांच्या जीवाशी खेळ करण्याचे काम करण्यात आले. हे मंगळवारी सभागृहात आमदार आशिष शेलार यांनी उघड केले.
    Published by:Sandip Parolekar
    First published: