मुंबई, 20 जानेवारी : भाजप नेते आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत हे राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो' यात्रेत सहभागी झाले आहेत. यावरून आशिष शेलार यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. देव, देश आणि धर्माच्या संघर्षातून गायब असलेले खा.संजय राऊत, काँग्रेसच्या युवराजांसोबत चालायला गेले, याच संगतीमुळे सरकार गेले, खासदार, आमदार गेले. पक्षाची शकले उडाली. "याच भल्या" कामाचा झेंडा तुम्ही घेऊन निघालाच आहात तर, तू चाल पुढं तुला र गड्या भीती कशाची असा टोला आशिष शेलार यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.
आशिष शेलार यांनी नेमकं काय म्हटलं?
आशिष शेलार यांनी एकापाठोपाठ एक असे दोन ट्विट करत त्यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी आपल्या पहिल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, 'देव, देश आणि धर्माच्या संघर्षातून गायब असलेले खा.संजय राऊत, काँग्रेसच्या युवराजांसोबत चालायला गेले! याच संगतीमुळे सरकार गेले, खासदार, आमदार गेले. पक्षाची शकले उडाली. "याच भल्या" कामाचा झेंडा तुम्ही घेऊन निघालाच आहात तर, तू चाल पुढं तुला र गड्या भीती कशाची!' असं ट्विट करत आशिष शेलार यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे.
हेही वाचा : ठाण्यात राष्ट्रवादीला मोठं खिंडार; बडा नेता शिंदे गटाच्या वाटेवर? आव्हाडांना धक्का!
त्यानंतर शेलार यांनी आणखी एक ट्विट केलं आहे. 'हिंदुत्वासाठी राम जन्मभूमीचा लढा जेव्हा लाखो कारसेवक लढत होते, तेव्हा मा. संजय राऊत प्रभादेवीच्या गल्लीत बसून होते, 370 कलम मुक्त काश्मीर व्हावे यासाठी असंख्य जण संघर्ष करीत होते, बलिदान देत होते, तेव्हा खा. संजय राऊत मुंबईत बसून मिडियात "ध्वनी प्रदूषण" करीत होते' अशी टीका शेलार यांनी केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ashish shelar, BJP, Congress, Rahul gandhi, Sanjay raut, Shiv sena