कोरोनाबाबत राज्यात सत्ताधाऱ्यांची 'अशी ही बनवाबनवी', भाजप नेत्यानं डागली तोफ

कोरोनाबाबत राज्यात सत्ताधाऱ्यांची 'अशी ही बनवाबनवी', भाजप नेत्यानं डागली तोफ

मुंबईतील परिस्थिती हाताबाहेर गेली असताना राज्य सरकार मात्र रोज आपलीच पाठ थोपटून घेते आहे.

  • Share this:

मुंबई, 29 मे: एकिकडे रुग्णांची संख्या वाढते आहे. रुग्णांना दाखल करून घेत नाहीत, रुग्णवाहिका नाहीत, मुंबईत हॉस्पिटल उभे केले तर डॉक्टर नाहीत, नर्स नाहीत, असे एकिकडे चित्र तर दुसरीकडे रुग्णांची खरी आकडेवारीच समोर येवू देत नाहीत. तिसरीकडे केंद्र सरकारकडून मदत आलीच नाही, असे सांगितले जाते आहे. महाराष्ट्रात सरकारची "अशी ही बनवाबनवी" सुरू आहे, असे सांगत भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे सरकारवर तोफ डागली आहे.

हेही वाचा...धक्कादायक! पुण्यात अजित पवारांच्या कार्यक्रमातच 'सोशल डिस्टन्सिंग'ची ऐसी तैसी

महाराष्ट्रात दुर्दैवाने रुग्णांची संख्या रोज वाढते आहे. विशेषतः मुंबईतील परिस्थिती हाताबाहेर गेली असताना राज्य सरकार मात्र रोज आपलीच पाठ थोपटून घेते आहे. कधी वरळी पँटर्न, कधी मुंबई पॅटर्न असे नवे नवे स्वतःच्या कौतुकाचे पॅटर्न तयार केले जात आहेत. केंद्रीय प्रधिकरणांचे, पथकांचे खोटे हवाले देऊन महाराष्ट्र सरकार आपले कौतुक करीत आहे. मुंबईत कोरोना रोखण्याच्या कामाचे निती आयोगाने कौतुक केले असे खोटे वृत्तही महाराष्ट्रात पसरवण्यात आले. त्यावर निती आयोगाने तातडीने खुलासा करून अशा प्रकारे कोणतेही कौतुक करण्यात आले नसल्याचे जाहीर केले. महाराष्ट्रात सध्या अशाच प्रकारची "बनवाबनवी" सुरू आहे.

त्यासोबतच केंद्र सरकार बाकी देशातील सर्वच राज्यांना मदत देते आहे आणि एकटया महाराष्ट्रावरच अन्याय करते आहे, असे खोटे चित्र महाराष्ट्रातील राज्य कर्त्यांकडून तयार केले जात आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी तर केंद्राकडून एकही पीपीई किट आले नाही, असे सांगितले तसेच जीएसटी परताव्याबाबतही भाष्य केले. एसटीच्या मंत्र्यांनी जीएसटीबाबत बोलल्यावर त्यांना विषय समजेल असे नाही. त्याना देण्यात आलेल्या कागदावरील माहिती वाचली तरी,प्रत्यक्षात सत्य मात्र वेगळे आहे.

केंद्र सरकारकडून 10 एप्रिलपासून 27 मे अखेर दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारला एन- 95 मास्क एकूण 15 लाख 08 हजार 400 तर पीपीई किट 9 लाख 82 हजार 730 आले आहेत.

हेही वाचा...कोरोनाचा कहर! 'या' व्यक्तींनी शक्यतो प्रवास टाळावा, रेल्वेचं प्रवाशांना आवाहन

पीपीई किटचा उल्लेख केंद्र सरकार "कव्हर्र ऑल" असा करण्यात हे बहुधा महाराष्ट्राच्या परिवहन मंत्र्यांना माहित नसल्याने ते पीपीई किट आलेच नाहीत, असे सांगत आहेत. हात मोजे 1 लाख 68 हजार आले आहेत. गॉगल्स 5 लाख 3 हजार 425 या सर्व वस्तु केंद्र सरकारकडून देण्यात आल्या तरीही महाराष्ट्रातील राज्यकर्ते जर काहीच मिळाले नाही, असे ओडरत असतील. तर मग या वस्तु गोदामांनी खाल्ल्या की काय? कसा सवाल ही आमदार आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.

First published: May 29, 2020, 3:46 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading