कोरोनाचा कहर आणि सत्ताधाऱ्यांचा कलेक्शनवर भर, आशिष शेलारांचा घणाघात

कोरोनाचा कहर आणि सत्ताधाऱ्यांचा कलेक्शनवर भर, आशिष शेलारांचा घणाघात

मुंबई, ठाणे, पुणे शहरातील बिल्डरांसाठी राज्य शासन प्रिमीयम कमी करण्याचा घाट घालत आहे.

  • Share this:

मुंबई, 17 सप्टेंबर: बांधकाम प्रकल्पांना आकारण्यात येणारा प्रिमियम कमी करण्यावर राज्य सरकार विचाराधीन आहे. मात्र, त्यावरू भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे. राज्यात कोरोनाचा कहर आणि सत्ताधाऱ्यांचा कलेक्शनवर भर, अशा सूचक शब्दांत निशाणा साधला आहे.

हेही वाचा..पदवी प्रमाणपत्रावर 'Covid-19'उल्लेख असणार का? शिक्षणमंत्र्यांचा खुलासा

प्रिमियममधून महापालिकांना उत्पन्न मिळते. मात्र राज्य शासनाने मुंबई, ठाणे, पुणे या शहरातील बांधकाम प्रकल्पांचा प्रिमियम कमी करण्याबाबत पारेख कमिटी गठीत केली आहे. प्रिमियम कमी करणे कुणासाठी सुरू आहे? असा सवाल करीत आमदार आशिष शेलार यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

त्यांनी म्हटले आहे की, मुंबई, ठाणे, पुणे शहरातील बिल्डरांसाठी राज्य शासन प्रिमीयम कमी करण्याचा घाट घालत आहे. त्यासाठी पारेख कमिटी गठीत करण्यात आली आहे.

हेही वाचा...पुण्यात बेवारस गाडीचं रहस्य उलगडलं, वडिलांच्या हत्येसाठी मुलानेच वापरली कार!

पण, प्रिमीयम कमी केल्याने महापालिकांचे उत्पन्न घटणार त्याचे काय? सर्वसामान्यांसाठी घराच्या किंमती कमी होणार का?त्या किती कमी होणार? रेडिरेकनरची फाईल जशी पुणे-मुंबई प्रवासात "लक्ष्मी दर्शन" करीत आली तशीच ही फाईल मंत्रालयातून कुठल्या कुठल्या "बंगल्यावर लक्ष्मीदर्शन" करीत फिरतेय? शेतकरी, श्रमिकांच्या प्रश्नांपेक्षा बिल्डरांच्या विषयात सरकारला अधिक रस का? राज्यात कोरोनाचा कहर आणि सत्ताधाऱ्यांचा कलेक्शनवर भर? अशा सूचक शब्दांत त्यांनी निशाणा साधला आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: September 17, 2020, 6:06 PM IST

ताज्या बातम्या