Home /News /maharashtra /

भाजपच्या नगरअध्यक्षाला 5 कोटींच्या घोटाळा प्रकरणात अटक

भाजपच्या नगरअध्यक्षाला 5 कोटींच्या घोटाळा प्रकरणात अटक

माजलगाव नगर पालिकेत विविध विकास कामांमध्ये पाच कोटींपेक्षा अधिक रक्कमेचा अपहार झाल्या प्रकरणी ठपका ठेवण्यात आला आहे

    बीड, 04 मार्च : नगर पालिकेच्या भ्रष्टाचार प्रकरणी माजलगावचे भाजपचे नगराध्यक्ष सहाल चाऊस यांना अटक करण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखा आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली. माजलगाव नगर पालिकेत विविध विकास कामांमध्ये पाच कोटींपेक्षा अधिक रक्कमेचा अपहार झाल्या प्रकरणी ठपका ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात तत्कालीन दोन मुख्याधिकारी यांच्यासह भाजपचे नगराध्यक्ष सहाल चाऊस यांचेही नाव होते. या सर्व प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडे होता. त्यांनी चाऊस यांना आज चौकशीसाठी ताब्यात घेतलं. सह आरोपी करत आज न्यायालयासमोर हजर केलं आहे. चाऊस यांनी नगराध्यक्ष पदाच्या काळात सत्तेचा दुरुपयोग करत भ्रष्टाचार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. माजलगांव नगरपालिकेत कोट्यवधीच्या अपहार प्रकरणी काही दिवसांपूर्वी तत्कालीन दोन मुख्याधिकाऱ्यांविरोधात  ४२० कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच दोन्हीही अधिकारी फरार होते. या गुन्ह्या प्रकरणी आज स्थानिक गुन्हे शाखा आणि आर्थिक गुन्हे शाखेने माजलगांवचे नगराध्यक्ष सहाल चाऊस यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. आज अखेर अटक करून न्यायालया समोर हजर करण्यात आले आहे. CAA ला विरोध भाजप नेत्याला पडलं महागात, पक्षाने केली मोठी कारवाई दरम्यान, भाजपने महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील उपनगराध्यक्षांना पक्षातून काढून टाकलं आहे. भाजपा शासित नगरपालिकेत CAA - NRC - NPR विरोधात ठराव संमत करून केंद्राकडे पाठविण्यात आला होता. त्यानंतर अनुशासनाचं कारण सांगून पक्षानं विनोद हरीभाऊ बोराडे पक्षातून निष्कासित करण्यात येत असल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. आपण नागरिकत्व सुधारणा कायदा हा पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगाणिस्तान या देशातील पीडित अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व देण्यासाठी कायदा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारने केला आहे. या कायद्याच्या विरोधात आपण नगर परिषदेत प्रस्ताव आणून त्याचे समर्थन करून आपण पक्षाविरोधी कृत्य केलं आहे. ही कृती अनुशासन भंग करणारी असून पार्टाने याची गंभीर दखल घेतली असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी पत्रकात म्हटलं आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Beed, BJP, Parli

    पुढील बातम्या