'मी बंड केलं तर सर्वांना थंड करून टाकेन',भाजप आमदाराचा पक्षालाच इशारा

'मी बंड केलं तर सर्वांना थंड करून टाकेन',भाजप आमदाराचा पक्षालाच इशारा

नाराज असलेल्या आमदार अनिल गोटे यांच्या भूमिकेवर अद्याप गिरीश महाजनांनी कोणतंही वक्तव्य केलेलं नाहीय.

  • Share this:

दिपक बोरसे, धुळे,15 आॅक्टोबर : धुळे जिल्ह्यातील आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची प्रभारीपदी नियुक्ती केल्यानं भाजप आमदार अनिल गोटे यांच्या हे चांगलच जिव्हारी लागलंय. गोटे यांनी थेट महाजन यांना 'चले जाव'चा नारा दिल्यानं धुळ्यात सध्या भाजप विरुद्ध आमदार गोटे असा सामना निवडणुकीपूर्वीच रंगलाय.

'मला बंड करायला भाग पाडू नका, मी बंड केलं तर सर्वांना थंड करून टाकेन' असा इशाराच धुळ्यातील भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी स्वपक्षाला दिलाय. धुळ्यात डिसेंबरमध्ये येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीआधीच जिल्ह्यात भाजपामध्ये जोरदार रणकंदन सुरू झालंय.

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल आणि आमदार अनिल गोटे यांच्यात विस्तवही जात नाही हे सर्वश्रुत आहे. यांच्या वादावर तोडगा काढण्यासाठी भाजपने गिरीश महाजन यांची प्रभारीपदी नियुक्ती केलीय. मात्र महाजन यांच्या निवडणीवरून आमदार गोटे भाजपवर नाराज आहेत. हे त्यांच्या बोलण्यातून लपलेलं नाही.

नाराज असलेल्या आमदार अनिल गोटे यांच्या भूमिकेवर अद्याप गिरीश महाजनांनी कोणतंही वक्तव्य केलेलं नाहीय.

नाशिक, पालघर, जळगावनंतर आता धुळे महापालिका निवडणुकांची जबाबदारी असलेल्या महाजनांना स्वपक्षातील आमदारांनीच खुलं आव्हान दिलंय. त्यामुळे भाजपमधील स्थानिक नेत्यांमधील तीव्र संघर्षावर रामबाण उपाय शोधण्याबरोबर आमदार गोटे यांची नाराजी दूर करण्याचं मोठं आव्हान गिरीश महाजन यांना असणार आहे.

विशेष म्हणजे, जळगाव महापालिका निवडणुकीत राज्याचे जलसंपदा मंत्री आणि यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारलेत. निवडणुकीच्या संपूर्ण प्रक्रियेतून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंना बाजूला ठेऊन महाजानांनी भाजपचं जळगावात 'कमळ' फुलवून दाखवलंय. जळगाव महापालिकेचा सत्ता काबिज करताना महाजनांनी आपले पूर्वाश्रमीचे राजकीय गुरू सुरेशदादा जैन यांनाही जोरदार धक्का देत चांगलाच धोबीपछाड दिला होता.

=====================================

#Metoo : भाजपच्या महिला आमदारांचं वादग्रस्त वक्तव्य; बघा काय म्हणाल्या...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 15, 2018 04:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading