• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • 'मी हर्बल तंबाखू खात नाही, दारु पिऊन बोलत नाही', अनिल बोंडेंचा नवाब मलिकांना टोला

'मी हर्बल तंबाखू खात नाही, दारु पिऊन बोलत नाही', अनिल बोंडेंचा नवाब मलिकांना टोला

भाजप नेते अनिल बोंडे

भाजप नेते अनिल बोंडे

अमरावती हिंसाराच्या घटनेवरुन भाजप नेते आणि राज्याचे माजी कृषीमंत्री अनिल बोंडे आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडत आहेत.

 • Share this:
  अमरावती, 18 नोव्हेंबर : अमरावती हिंसाराच्या घटनेवरुन भाजप नेते आणि राज्याचे माजी कृषीमंत्री अनिल बोंडे आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडत आहेत. मलिक यांनी ट्विटरवर अमरावती हिंसाचार प्रकरणाशी संबंधित बोंडे यांचं कथित ऑडिओ क्लीप शेअर केलं होतं. त्यावर बोंडे यांनी देखील प्रत्युत्तर दिलं. आता अनिल बोंडे यांनी पुन्हा एकदा नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे. विशेष म्हणजे त्यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला आहे.

  अनिल बोंडे नेमकं काय म्हणाले?

  "मी माझ्या कालच्या संभाषणावर पूर्णत: ठाम आहे. कारण मी जे काही बोलतो ते शुद्धीत बोलतो. मी कोणतंही हर्बल तंबाखू खात नाही. मी दारु पिऊन बोलत नाही. त्यामुळे नवाब मलिकांसारखं बेहोशीमध्ये वक्तव्य करण्याची माझी सवय नाही. मी जे बोललो त्यावर कायम आहे. भाजपची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये दंगली होत नाही. महाविकास आघाडीच्या किंवा तथाकथित सेक्यूर, डाव्या विचारांचं सरकार असलेल्या राज्यामध्ये दंगली होतात. कारण या दंगलीला संरक्षण आणि प्रोत्साहन देण्याचं काम हे सरकार करतं. त्यातले मंत्री करतात", असा आरोप नवाब मलिक यांनी केला. हेही वाचा : इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून पडून लहान मुलाचा मृत्यू; गृह प्रवेशाच्या दिवशीच घडली दुर्घटना

  अनिल बोंडे यांची शरद पवारांवरही टीका

  अनिल बोंडे यांनी यावेळी शरद पवार यांच्यावर देखील टीका केली. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी शरद पवार कधीच खोटं बोलत नाहीत, असं विधान केलं होतं. त्यांच्या या विधानाबाबत पत्रकारांनी अनिल बोंडे यांना प्रश्न विचारला असता, "शरद पवार कधी खोटं बोलत नाही असं संजय राऊत म्हणतात, हे तर असं झालंय की मांजर कधीच उंदीर खात नाही", असं मिश्किल उत्तर अनिल बोंडे यांनी दिलं. हेही वाचा : काय बोलतो भिडू? अवघ्या दहा वर्षाचा मुलगा जगण्याचा मार्ग सांगतो, VIDEO व्हायरल त्रिपुरातील कथित हिंसाचाराचे अमरावतीत 12 नोव्हेंबरला तीव्र पडसाद उमटले होते. अमरावतीत रझा अकादमीकडून मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी या मोर्चाला हिंसाचाराचं वळण लागलं होतं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 13 नोव्हेंबरला शहरात भाजपकडून बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला देखील हिंसाचाराचं वळण लागलं होतं. त्यामुळे अमरावतीत संचारबंदी लावण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी काही भाजप कार्यकर्त्यांवर अटकेची कारवाई केली होती. यामध्ये अनिल बोंडे यांचादेखील समावेश होता. बोंडे यांना नंतर जामीन मंजूर झाला होता.
  Published by:Chetan Patil
  First published: