फडणवीसांचा डायलॉग वापरत नारायण राणेंचा ठाकरे पिता-पुत्रावर शाब्दिक हल्ला

फडणवीसांचा डायलॉग वापरत नारायण राणेंचा ठाकरे पिता-पुत्रावर शाब्दिक हल्ला

नारायण राणे यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरलं आहे.

  • Share this:

ठाणे, 12 डिसेंबर : भाजप नेते आणि राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टार्गेट केलं आहे. 'या सरकारकडून कोणतीही अपेक्षा नाही. हे सरकार अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. सरकारला सिरीयस बेस नाही. राज्याचे प्रशासन माहिती नाही. विकास माहिती नाही. अशा माणसाच्या हातात सत्ता गेल्याने त्यांच्याकडून अपेक्षा काय ठेवायची?' असा बोचरा सवाल करत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

'सीएएबाबत आदित्य ठाकरे यांनी भाजपला शिकवण्याची गरज नाही. भाजपमध्ये शिकलेले लोक आहेत. आदित्य ठाकरेंना कायदा काय माहीत आहे? जी मंत्र्यांची जबाबदारी आहे त्यांनी ती जबाबदारी आधी नीट पार पाडावी. त्यातील काय कळतं हे आधी बघावं आणि नंतर भाजपवर बोलावं,' असा हल्लाबोल नारायण राणे यांनी केला आहे.

नारायण राणे सरकारवर बरसले

'या सरकारने कर्जमाफीची दोन लाखापर्यंत अट ठेवली. मात्र जीआर काढताना कर्जमाफीच्या अंबलबजावणीच्या तारखेचा उल्लेख केलाच नाही. कर्जमाफी कधी मिळेल हे सांगता येत नाही,' असं म्हणत नारायण राणे यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरलं आहे.

'आम्ही पुन्हा सत्तेवर येऊ'

विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांचा 'मी पुन्हा येईन' हा डायलॉग चांगलाच गाजला होता. त्यानंतर आता नारायण राणे यांनीही आम्ही पुन्हा सत्तेवर येऊ, असा दावा केला आहे. 'भाजप सत्तेसाठी कोणाकडे गेली नव्हती. शिवसेना स्वतः भाजपकडे आली होती. भाजप केंद्रात आहे. महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात भाजपचे आमदार आहे. त्यामुळे भाजपला कोणाची फिकीर करण्याचे गरज नाही. 54 पैकी 35 त्यांच्याकडेच नाराज आहेत,' असा दावा खासदार नारायण राणे यांनी केला. तसंच या सरकारला कायमची सत्ता दिली नाही. आम्ही पुन्हा सत्तेवर येऊ, असा विश्वासदेखील नारायण राणे यांनी व्यक्त केला.

मनसे-भाजपच्या संभाव्य युतीबद्दल राणे म्हणतात...

विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना भाजपपासून दूर गेली. त्यानंतर शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मदतीने सत्ताही स्थापन केली. या पार्श्वभूमीवर भाजप राज्यात नवीन मित्राच्या शोधात असल्याचं दिसत आहे. त्यामुळे मनसे आणि भाजपच्या युतीची चर्चा रंगत आहे. मात्र याबाबत बोलणं नारायण राणे यांनी टाळलं आहे. 'मनसे आणि भाजप बाबत मी बोलणार नाही. ते पक्षाचे प्रमुख बोलतील,' असं नारायण राणे म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 12, 2020 12:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading