'आमदारकी भिकेमध्ये मिळाली', निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर विखारी टीका

'आमदारकी भिकेमध्ये मिळाली', निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर विखारी टीका

भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना टार्गेट केलं आहे.

  • Share this:

मुंबई, 9 एप्रिल : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर राजकीय पेच निर्माण झाला होता. मात्र या संकटावर मार्ग काढत आता राज्यपालांनी उद्धव ठाकरे यांची नियुक्त करावी, यासाठी महाराष्ट्र कॅबिनेटकडून शिफारस करण्यात येणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र याच मुद्द्यावरून भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना टार्गेट केलं आहे.

'महाराष्ट्रासाठी पनवती असले तरी स्वतःसाठी नशीबवान आहे उद्धव ठाकरे. सगळं बसल्या बसल्या मिळालं. आता आमदारकी पण बसल्या ठिकाणी राज्यपालांनी दिली. भिकेमध्ये मिळालेल्या या आमदारकीचा वापर महाराष्ट्रासाठी करा. मुख्यमंत्रिपद काँग्रेस-राष्ट्रवादीमुळे, आमदारकी राज्यपालांकडून, पक्ष वडिलांचा... या माणसाचं स्वतःचं काहीच नाही,' असा घणाघाती शाब्दिक हल्ला निलेश राणे यांनी ट्विटरवरून केला आहे.

दरम्यान, निलेश राणे हे ट्विटरवरुन सतत ठाकरे सरकारवर निशाणा साधत असतात. नुकतंच जितेंद्र आव्हाडांवर झालेल्या मारहाणाची आरोपानंतरही त्यांनी सरकारचा समाचार घेतला होता. 'फक्त सोशल मीडिया वर स्वतःचं वेगळं मत मांडल्यामुळे एक मंत्र्याच्या सांगण्यावरून याला उचलला त्याच मंत्र्याच्या आणि पोलिसांच्या समोर 15 ते 20 जणांनी ठाण्याच्या तरुणाला मार मार मारला. हा सरकारचा खरा चेहरा,' अशी टीका निलेश राणे यांनी केली होती.

उद्धव ठाकरे यांनी कसा सोडवला राजकीय पेच?

'राज्यपाल नियुक्त रिक्त दोन जागा आहेत. त्यावर ठाकरे यांची नियुक्ती करावी, यासाठी आजची बैठक झाली की कॅबिनेट शिफारस करेल. यापूर्वी दोन जागांवर राष्ट्रवादीकडून आदिती नलावडे आणि गर्जे यांच्या नावाची शिफारस केली होती. पण राज्यपालांनी अद्याप कोणताही निर्णय घेतला नव्हता. अशातच आता कॅबिनेटकडून एका जागेसाठी उद्धव ठाकरे यांच्या नावाची शिफारस करण्यात येणार आहे.

संपादन - अक्षय शितोळे

First published: April 9, 2020, 4:52 PM IST

ताज्या बातम्या