सभागृहात फटकेबाजी करणाऱ्या अजित पवारांना निलेश राणेंनी घेतलं अंगावर

सभागृहात फटकेबाजी करणाऱ्या अजित पवारांना निलेश राणेंनी घेतलं अंगावर

माजी खासदार निलेश राणे यांनी अजित पवारांवर खोचक टीका केली आहे.

  • Share this:

मुंबई, 13 मार्च : राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या खास शैलीतील फटकेबाजीसाठी ओळखले जातात. अशीच फटकेबाजी अजित पवार यांनी विधानसभेत केली. 'मध्य प्रदेशसारखं महाराष्ट्रातही कोणी तरी ज्योतिरादित्य शिंदे होईल,' असं म्हणत भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला. त्यावर उत्तर देताना अजित पवार यांनी विनोदी शैलीत तुफान फटकेबाजी केली.

अजित पवार यांनी भाजपला कोपरखळ्या लगावल्यानंतर भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी अजित पवारांवर खोचक टीका केली आहे. 'अजित पवारांच्या कॉन्फिडन्सला मानावं लागेल. ज्या भाजपसोबत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली पण एकही आमदार सोबत नाही म्हणून राजीनामा दिला, त्याच भाजपला आज टोला मारत आहेत,' असं ट्वीट करत निलेश राणे यांनी अजित पवारांवर टीका केली आहे.

सभागृहात फटकेबाजी करताना काय म्हणाले होते अजित पवार?

'तुम्ही काही म्हणालात तरीही आमच्याकडे कोणीही ज्योतिरादित्य होणार नाही. तुम्हीच जरा काळजी घ्या, नाहीतर तुमच्यातच कोणीतरी ज्योतिरादित्य होईल. तुमचे आमदार कधीही उधळतील, त्यांना सांभाळा,' असं म्हणत अजित पवार यांनी भाजपवर पलटवार केला. तसंच अजित पवार यांनी आमदारांना झालेला निधी वापट आणि फडणवीस यांच्यासोबत घेतलेली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ याबाबतही रोखठोक भाष्य केलं.

सुधीर मुनगंटीवारांनी लगावला होता टोला?

विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपमध्ये आम्ही जे काही ठरविले होते, त्यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फारकत घेतली. त्यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी फारकत घेतली, असं धक्कादायक विधान माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. आमच्या चुकीचा फायदा काँग्रेस-राष्ट्रवादीला झाला, असा घरचा आहेर मुनगंटीवार यांनी आपल्याच पक्षातील नेत्यांना दिला आहे. आमच्या चुकीचा तुम्ही एवढा फायदा उचलू नका. राज्यातही कोणी ना कोणी ज्योतिरादित्य शिंदे निर्माण होईलच. राज्याच्या अर्थसंकल्पावर सुरू असलेल्य़ा चर्चेत मुनगंटीवार बोलत होते.

First published: March 13, 2020, 9:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading