Home /News /maharashtra /

भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपानंतर देवेंद्र फडणवीसांनी पहिल्यांदाच दिलं स्पष्टीकरण

भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपानंतर देवेंद्र फडणवीसांनी पहिल्यांदाच दिलं स्पष्टीकरण

फाईल फोटो

फाईल फोटो

सर्व आरोपांबाबत देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिलं आहे.

    मुंबई, 4 मार्च : सिडको संदर्भातील काही प्रकरणांमध्ये कॅगेने ताशेरे ओढल्यानंतर भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अडचणीत आल्याची चर्चा आहे. या प्रकरणावरून महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. या सर्व आरोपांबाबत देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिलं आहे. '2014 पूर्वीच्या दोन प्रकरणात कॅगने ताशेरे ओढले आहेत. त्यावेळी मुख्यमंत्रिपद पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे होते. पण तरीही माझं हे मत आहे की सिडकोचा विषय मुख्यमंत्र्यांकडे येत नाही. यावरून कोणी राजकारण करू नये. सिडको हे स्वायत्त बोर्ड आहे, त्याचे निर्णय मुख्यमंत्र्यांकडे येत नाहीत,' असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. 'सिडकोबाबत 2013 ते 2018 या कालावधीतील अहवाल आहे. जर अनियमितता झाली असेल तर कारवाई करतील. पण मुख्यमंत्र्यांचा याच्याशी थेट संबंध येत नाही, हे आवर्जून सांगतो. नंतर कॅग रिपोर्ट यावर साक्ष होईल, त्यात समोर येईल, पण कॅगच्या रिपोर्टनंतर कामकाजात काही बदल करावे लागतील हे निश्चित आहे,' असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. फडणवीसांना कोंडीत पकडण्यासाठी सरकारच्या हालचाली? फडणवीस सरकारच्या कालावधीत सिडकोबाबतच्या काही प्रकरणावरून कॅगने ताशेरे ओढले. याबाबत काही दिवसांपूर्वी कॅबिनेट बैठकीत झाल्याची माहिती समोर आली होती. कॅबिनेटमध्ये कॅगचा अहवाल सादर करण्यात आल्याचं बोललं गेलं. त्यामुळे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अडचणीत येण्याची शक्यता आहे. हेही वाचा- CAA ला विरोध भाजप नेत्याला पडलं महागात, पक्षाने केली मोठी कारवाई फडणवीस सरकारच्या काळात सीडकोमध्ये घोटाळा झाल्याची कॅबिनेटमध्ये चर्चा झाली. सिडकोवर कॅगने ताशेरे ओढले आहेत. सिडकोमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा कॅगचा अहवाल आहे. हजारो कोटींचा घोटाळा झाल्याचा ठपका कॅगने ठेवल्याची माहिती आहे. त्यावर कॅबिनेटमध्ये प्राथमिक चर्चा झाल्याचं कळतंय. त्यामुळे या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस आणि भाजपला अडचणीत पकडण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून करण्यात येऊ शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Cag, CAG report, Devendra Fadanvis

    पुढील बातम्या