'सत्य कधीही लपणार नाही', पुन्हा ठाकरे सरकारवर बरसले निलेश राणे

'सत्य कधीही लपणार नाही', पुन्हा ठाकरे सरकारवर बरसले निलेश राणे

भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी राज्य सरकारवर पुन्हा एकदा घणाघाती टीका केली आहे.

  • Share this:

मुंबई, 12 एप्रिल : महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी राज्य सरकारवर पुन्हा एकदा घणाघाती टीका केली आहे. 'मुख्यमंत्री परत परत सांगत आहेत की राजकारण करू नका. कोण करतंय राजकारण? सगळ्या पक्षातले लोकं आपआपल्या परीने मदत करत आहेत. कोण दाखवून करत आहेत तर कोण न दाखवता. पण जर धान्य मिळत नसेल, राज्यात रुग्ण वाढत असतील, सरकारी कामात नियोजन दिसत नसेल तर सरकारला प्रश्न विचारले जाणारच,' अशी आक्रमक भूमिका निलेश राणे यांनी घेतली आहे.

'लाखो रुपये खर्च करून कितीही PR टीम कामाला लावल्या तरी सत्य कधीही लपणार नाही. मुख्यमंत्री अगदी व्यवस्थित काम करतायत मग या अवस्थेला जबाबदार कोण?' असा सवाल करत निलेश राणे यांनी एक व्हिडिओ ट्वीट केला आहे. या व्हिडिओमध्ये केईएम रुग्णालयातील काही रुग्ण असल्याचं पाहायला मिळत असून त्यांच्याबाबत करण्यात आलेल्या निष्काळजीपणावरून निलेश राणे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

उद्धव ठाकरेंवर याआधीही केली होती विखारी टीका

निलेश राणे हे ट्विटरवरुन सतत ठाकरे सरकारवर निशाणा साधत असतात. आमदारकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या नावाची शिफारस मंत्रिमंडळाने राज्यपालांकडे केल्यानंतरही निलेश राणे यांनी घणाघाती टीका केली होती. 'महाराष्ट्रासाठी पनवती असले तरी स्वतःसाठी नशीबवान आहे उद्धव ठाकरे. सगळं बसल्या बसल्या मिळालं. आता आमदारकी पण बसल्या ठिकाणी राज्यपालांनी दिली. भिकेमध्ये मिळालेल्या या आमदारकीचा वापर महाराष्ट्रासाठी करा. मुख्यमंत्रिपद काँग्रेस-राष्ट्रवादीमुळे, आमदारकी राज्यपालांकडून, पक्ष वडिलांचा... या माणसाचं स्वतःचं काहीच नाही,' असा घणाघाती शाब्दिक हल्ला निलेश राणे यांनी ट्विटरवरून केला होता.

First published: April 12, 2020, 6:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading