मुंबई, 07 जून : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींबद्दल अपशब्द वापरणे भाजपच्या 2 नेत्यांना चांगलंच महागात पडलं आहे. लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरींना काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागण्याची भविष्यवाणी या नेत्यांनी केली. शिवाय, नितीन गडकरींविरोधात अपशब्द देखील वापरले होते. लोकसभा निवडणुकीदरम्यानचं हे संभाषण सोशल मीडियावर व्हायरल झालं. त्यानंतर पक्षानं त्याची दखल घेत दोन्ही नेत्याचं सहा वर्षासाठी निलंबन केलं. दोन्ही नेते हे नागपुरातील भाजपचे नेते आहेत.
ज्या दोन नेत्यांचा ऑडिओ व्हायरल झाला त्यांचं नाव जयहरी सिंग ठाकूर आणि अभय तिडके असल्याचं हिंदुस्थान टाईम्सनं म्हटलं आहे. रिपोर्टनुसार दोन्ही नेते हे लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरी पराभव होणार अशी भविष्यवाणी करत आहेत. त्यांनी नितीन गडकरींविरोधात अपशब्द देखील वापरले आहेत. लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरी यांनी काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांचा 1,97000 मतांनी पराभव केला आहे.
अटलबिहारी वाजपेयींच्या घरात आता राहणार अमित शहा?
कोण आहेत दोन्ही नेता?
निलंबित करण्यात आलेले जयहरी सिंग ठाकूर नागपूर भाजपचे उपाध्यक्ष आहेत. तर, अभय तिडके हे पक्षाच्या एका समितीचे सदस्य आहेत. लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी केलंल संभाषण व्हायरल झालं. त्यानंतर त्यांना पदावरून सहा वर्षासाठी निलंबित करण्यात आलं आहे.
भाजपच्या वाटेवरील विखेंचं काँग्रेसला खुलं आव्हान
पटोलेंचं आव्हान
नना पटोले यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र डागत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर काँग्रेसनं त्यांना नागपुरातून गडकरींविरोधात मैदानात उतरवलं होतं. लोकसभा निवडणुकीदरम्यान नाना पटोले गडकरींना आव्हान उभं करणार असं चित्र होतं. पण, निकालाअंती मात्र नागपूरकरांनी गडकरींना पसंती दिल्याचं स्पष्ट झालं.
प्रकाश आंबेडकरांची आक्रमक भूमिका...यासोबत महत्त्वाच्या 18 घडामोडी