दुष्काळमुक्ती आणि रोजगार निर्मितीवर भर देणार, भाजपच्या संकल्पपत्राचं प्रकाशन

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने 16 कलमी संकल्पपत्राचं प्रकाशन केलं.

News18 Lokmat | Updated On: Oct 15, 2019 10:52 AM IST

दुष्काळमुक्ती आणि रोजगार निर्मितीवर भर देणार, भाजपच्या संकल्पपत्राचं प्रकाशन

मुंबई, 15 ऑक्टोबर : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु असून भाजपने संकल्पपत्राचं प्रकाशन केलं आहे. वांद्र्यातील रंगशारदा सभागृहात हा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी भाजपचं एक प्रचारगीतही प्रकाशित करण्यात आलं. या प्रचारगीतात बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, रामदास आठवले यांचाही समावेश आहे. राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपने वचननामा प्रकाशित केला.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, गेल्या पाच वर्षांत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काय केलं हे वेगळं सांगण्याची गरज नाही. गेल्या पाच वर्षांत कोणताही जातीय दंगा नाही. एकदाही गोळीबार नाही. अतिशय उत्तम असं सरकार चालवलं.

राज्यात युतीचं सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण असा प्रश्न अनेकदा पुढे येतो. त्यावर पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट उत्तर दिलं आहे. त्यांनी संकल्पपत्र प्रकाशित करताना म्हटलं की, सध्याचे मुख्यमंत्री आणि पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणत या प्रश्नाचं उत्तर दिलं.

राज्याला निसर्गाच्या असमतोलपणाचा फटका बसल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले. एका भागाता महापूर आणि दुसरीकडं दुष्काळ अशा विचित्र परिस्थितीत महाराष्ट्र सापडला. महाराष्ट्र दुष्काळमुक्त करणं हा आमचा मोठा संकल्प असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक, इंदू मिल स्मारकासह उर्वरीत प्रलंबित कामं आगामी काळात पूर्ण होतील असंही ते म्हणाले.

Loading...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळ, पाणी आणि रोजगार या तीन महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश संकल्पपत्रात असल्याचं म्हटलं. महापुराचं पाणी जे समुद्राला जातं, वाया जाणारं हे पाणी वळवून दुष्काळग्रस्त भागाला नेण्याची योजना असल्याचं फडणवीस म्हणाले. राज्यात रोजगार निर्मितीवर भर देणार आहे असंही त्यांनी सांगितलं. पायांभूत सुविधांवर भर देण्याचा प्रयत्न करणार असून कोकणातलं पाणी गोदावरी खोऱ्यात आणू असं आश्वासनही त्यांनी दिलं.

भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा यांनी हे संकल्पपत्र अभ्यासपूर्ण आणि वास्तवादी असल्याचं सांगितलं. पाच वर्षांपूर्वी महाराष्ट्र भ्रष्टाचारानं पोखरला होता. तो आता भ्रष्टाचार मुक्त झाल्याचं जेपी नड्डा यांनी म्हटलं.

राज्यातील शेवटच्या व्यक्तीचा विचार करून हे संकल्पपत्र तयार करण्यात आलं आहे. 2022 पर्यंत सर्वांना शुद्ध पाणी देणार असंही ते म्हणाले. जेपी नड्डा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करत फडणवीसांमुळे मुख्यमंत्रीपदाला स्थैर्य प्राप्त झालं.

VIDEO : धावत्या लोकलमधून चोरानं हिसकावला मोबाईल, पुढे काय घडलं तुम्हीच पाहा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 15, 2019 10:52 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...