मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /किरीट सोमय्यांच्या टार्गेटवर आता जालन्यातलाच राष्ट्रवादीचा मोठा नेता? वाचा नेमकं काय म्हणाले...

किरीट सोमय्यांच्या टार्गेटवर आता जालन्यातलाच राष्ट्रवादीचा मोठा नेता? वाचा नेमकं काय म्हणाले...

भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आता जालन्यातीलच राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) मोठा नेता आणि राज्य सरकारमधील महत्त्वाच्या खात्यातील एका मंत्र्यासंबंधित वक्तव्य केलं आहे. त्या वक्तव्यावरुन सोमय्यांचं पुढचं टार्गेट तोच नेता असणार असल्याची दाट शक्यता आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आता जालन्यातीलच राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) मोठा नेता आणि राज्य सरकारमधील महत्त्वाच्या खात्यातील एका मंत्र्यासंबंधित वक्तव्य केलं आहे. त्या वक्तव्यावरुन सोमय्यांचं पुढचं टार्गेट तोच नेता असणार असल्याची दाट शक्यता आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आता जालन्यातीलच राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) मोठा नेता आणि राज्य सरकारमधील महत्त्वाच्या खात्यातील एका मंत्र्यासंबंधित वक्तव्य केलं आहे. त्या वक्तव्यावरुन सोमय्यांचं पुढचं टार्गेट तोच नेता असणार असल्याची दाट शक्यता आहे.

पुढे वाचा ...

विजय कमळे पाटील, प्रतिनिधी

जालना, 1 डिसेंबर : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आज जालना (Jalna) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. सोमय्या यांनी आज जालन्यात रामनगर साखर कारखान्याला भेट देत शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. या दौऱ्यादरम्यान किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारमधील आणखी एका बड्या नेत्यावर निशाणा साधला आहे. सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे जालन्यातील मोठा नेते म्हणून ख्याती असलेले अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांच्यावर 100 कोटी घोटाळ्याचे गंभीर आरोप केले होते. त्यानंतर किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आता जालन्यातीलच राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) मोठा नेता आणि राज्य सरकारमधील महत्त्वाच्या खात्यातील एका मंत्र्यासंबंधित वक्तव्य केलं आहे. त्या वक्तव्यावरुन सोमय्यांचं पुढचं टार्गेट तोच नेता असणार असल्याची दाट शक्यता आहे.

किरीट सोमय्या यांचं नेक्स्ट टार्गेट कोण?

किरीट सोमय्या यांनी पत्रकारांशी बोलताना आपलं पुढचं टार्गेट कोण असेल याचा सूचक इशारा दिला आहे. किरीट सोमय्या यांचा रोख हा थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे जालन्यातील मोठे नेते, जालन्याचे पालकमंत्री आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या दिशेला होता.

सोमय्या नेमकं काय म्हणाले?

"राजेश टोपे यांच्या संबंधात माझ्याकडे काही पेपर आलेले आहेत. तक्रार आजच आल्या आहेत. त्यामुळे त्याचं पूर्ण अध्ययन होईपर्यंत मी त्यावर कमेंट करणार नाही. मी काल अमरावतीत सांगितलं, येत्या काही दिवसात मी ठाकरे सरकारच्या आणखी चार नेते आणि मंत्र्यांचे भ्रष्टाचार समोर आणणार आहे. यामध्ये दोन शिवसेनेचे आहेत. ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मित्र-परिवारातील आहेत. तिसरे काँग्रेसचे विदर्भातील कॅबिनेट कक्षाचे आहेत. चौथे राष्ट्रवादीचे आहेत. त्यांच्याबाबत मी योग्य वेळेला सांगणार", असं किरीट सोमय्या यावेळी म्हणाले.

हेही वाचा : वीज वापरता मग वीजबिल भरायला का नको? ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा सवाल

किरीट सोमय्यांचा अर्जुन खोतकरांवर निशाणा

जालन्यातील शिवसेनेचे नेते अर्जून खोतकर यांनी जरंडेश्वर कारखान्याच्या घोटाळ्याची कॉपी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जरंडेश्वर कारखान्यात घोटाळा केला तसाच खोतकरांनी जालना साखर कारखाना खरेदीत भ्रष्टाचार केला आहे. हा कारखाना खरेदीसाठी खोतकर यांच्याकडे पैसा आला कुठून? असा सवाल उपस्थित करत किरीट सोमय्या यांनी खोतकर यांच्यावर निशाणा साधला आहे. शिवाय घोटाळेबाज हा घोटाळेबाज असतो असं सांगत त्यांनी खोतकर यांच्यावर कारवाई होणार असल्याच सांगितल आहे. महाभारतातील अर्जुन हे वेगळ्या कारणासाठी ओळखले जायचे. मात्र ठाकरे सरकारमधील अर्जुन हे भ्रष्टाचारासाठी ओळखले जातायत, असं सांगत या कारखान्यांच्या घोटाळ्याप्रकरणी अर्जुन खोतकर यांच्यावर कारवाई होणार असल्याचे सोमय्या यांनी म्हटलंय.

हेही वाचा : 'आता UPA आहे का?' काँग्रेसच्या प्रश्नावर ममता बॅनर्जींचा सवाल

'शिशुपालाचे आता 100 गुन्हे भरले, मी शेवट करणार', खोतकरांचं उत्तर

दरम्यान, अर्जून खोतकर यांनी सोमय्या यांचे हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. "सोमय्या हे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या निमंत्रणावरुन जालना दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी खालच्या पातळीवर जाऊन सूड घ्यायला सुरुवात केलीय. मी कोणत्याही परिस्थितीला तोंड द्यायला तयार आहे. शिशुपालाचे आता 100 गुन्हे झाले आहेत. सुरुवात त्यांनी केलीय आता शेवट मी करीन", असा इशारा देखील खोतकरांनी रावसाहेब दानवे यांना दिलाय.

'किरीट सोमय्या ईडीचा बॉस आहेत का?'

अर्जुन खोतकरवर कारवाई होणार हे सांगायला किरीट सोमय्या ईडीचा बॉस आहेत का? असा सवाल देखील खोतकर यांनी उपस्थित केला. बोगस रस्ते करणाऱ्यांना बुलडोजर खाली घालीन अशी चेतावणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देत असतात. आता ती वेळ आली आहे, असं सांगत दानवे यांनी रस्त्याच्या कामात केलेला भ्रष्टाचार बाहेर काढण्याचा इशारा खोतकर यांनी दिला.

First published:
top videos