बीड, 16 ऑगस्ट : पंकजा मुंडे अंगार है बाकी सब भंगार है, अमर रहे अमर रहे गोपीनाथ मुंडे अमर रहे. या घोषणा गोपीनाथ गडावर मुंडे समर्थकांकडून देण्यात आल्या. तर यावेळी घोषणाबाजीवरून, पंकजा मुंडे प्रचंड संतप्त झाल्या होत्या. यावेळी कार्यकर्त्यांना पंकजा मुंडेंनी (Pankaja Munde) चांगलेच कार्यकर्त्यांना झापलं. चुकीच्या घोषणा देणाऱ्यांना मी बोलणार नाही, भेटणार नाही, चांगल्या घोषणा द्या, अंगार भंगार या काय घोषणा देतायत, हे संस्कार आहेत का आपले? अस म्हणत संतापलेल्या पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांना झापले. भाजपचे केंद्रीय मंत्री भागवत कराड (Bhagwat Karad) यांची जन आशीर्वाद यात्रा (Jan Ashirwad yatra) आज परळी येथील गोपीनाथ गडावरुन (Gopinath Gadh) लोकनेते दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीस्थळाच्या दर्शनासाठी आले असता कार्यकर्त्यानी घोषणाबाजी केली. यावेळी पंकजा मुंडेंनी घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्याना चांगलंच झापलं. यावेळी संताप व्यक्त करत तुमच्या बालिश पणाचा मला त्रास होतोय अस देखील त्या म्हणाल्या.
या जन आशीर्वाद यात्रेला भाजपचा झेंडा दाखवून प्रारंभ केला आहे. यावेळी खासदार प्रीतम मुंडे देखील उपस्थित होत्या. दरम्यान यावेळी मुंडे समर्थकांना गोपीनाथ गडावर दाखल होताच तीव्र घोषणाबाजीला सुरुवात केली होती.
— News18Lokmat (@News18lokmat) August 16, 2021
भागवत कराडांची जन आशीर्वाद यात्रा गोपीनाथ गडावर, मुंडे समर्थकांची जोरदार घोषणाबाजी
केंद्रीय मंत्री भागवत कराड हे आपल्या जनआशीर्वाद यात्रेची सुरुवात करण्यासाठी गोपीनाथ गडावर दाखल झाले. यावेळी त्यांच्यासोबत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे, खासदार प्रितम मुंडे सुद्धा उपस्थित होत्या. याच दरम्यान पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळीपंकजा मुंढे यांनी समर्थकांची खरडपट्टी सुद्धा काढली मात्र, तरीही मुंडे समर्थकांनी आपल्या घोषणा सुरूच ठेवल्या. प्रचंड गदारोळात यात्रेला शेवटी सुरवात झाली. पंकजा मुंडे यांनी जनआशीर्वाद यात्रेला झेंडा दाखवला आणि त्यानंतर यात्रेला सुरुवात झाली.
केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने पंकजा मुंडे, प्रितम मुंडे नाराज असल्याची जोरदार चर्चा होती. यानंतर पंकजा मुंडे समर्थकांनी आपले राजीनामा अस्त्र सुद्धा सुरू केले होते. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी समर्थकांची समजूत काढत राजीनामे मागे घेण्यास सांगितले. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी आपण नाराज नसल्याचंही जाहीपणे सांगितले. आता भागवत कराड यांच्या जन आशीर्वाद यात्रेतही पंकजा मुंडे सहभागी झाल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pankaja munde