Home /News /maharashtra /

भाजप दमबाजीला घाबरत नाही, आशिष शेलारांचं राऊतांना प्रत्युत्तर

भाजप दमबाजीला घाबरत नाही, आशिष शेलारांचं राऊतांना प्रत्युत्तर

'भाजप अशा कुठल्याही पक्षाला या एजन्सीवर दबावतंत्र करुन काम करू देणार नाही''

अमरावती, 28 डिसेंबर : 'आपल्या दमडी दमडीचाही हिशेब संजय राऊत यांनी ईडी ला द्यावा, दमबाजी करू नये आणि भाजप (BJP) दमबाजीला घाबरत नाही' असं जोरदार प्रतिउत्तर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना दिले आहे. अमरावती येथे पत्रकारांशी बोलत असताना आशिष शेलार यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या आरोपांना जशास तसे उत्तर दिले. 'सगळ्या एजन्सीवर दबावतंत्राचा राजकारण शिवसेना करून पाहत आहे.  या तपास यंत्रणाचं पावित्र्य जनता राखणार की नाही? याचाच प्रश्न निर्माण होईल. भाजप अशा कुठल्याही पक्षाला या एजन्सीवर दबावतंत्र करुन काम करू देणार नाही' असं शेलार म्हणाले. '...तर उद्धव ठाकरेंना 2 वर्षासाठी मुख्यमंत्रिपद मिळेल', आठवलेंनी सांगितलं गणित 'कंगना रनौत यांचं घर तोडताना मर्दानगी होती का? कंगना रनौत यांना मुबईमध्ये येऊ देणार नाही. त्यांचं तोंड फोडू तेव्हा शिवसेनेला मर्दानगी आठवली नाही का? त्यामुळे शिवसेनेनं आधी स्वतःकडे बघावं स्वतःच्या पायाखालची जमीन घसरली, कर नाही तर डर कशाला. राऊत यांनी डराव डराव करू नये, अशी टीकाही आशिष शेलार यांनी केली. थर्टी फस्ट सेलिब्रेशनचा प्लॅन आहे? राज्य सरकारने केल्या 9 सूचना 'संजय राऊत जे काही बोलत आहेत ते तथ्यहीन बोलत आहे. एका नोटीस मध्येच संजय राऊत पूर्ण हादरून गेले आहे, हे संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. त्यांनी चूक केली नसेल तर त्यांना घाबरायचे कारण नाही. या देशात कायद्याचे राज्य आहे आणि त्यांना त्यांची बाजू मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे' असंही शेलार म्हणाले. काय म्हणाले होते संजय राऊत? 'भाजपचे 3 नेते हे सतत ईडीच्या कार्यालयात जाऊन कागदपत्र घेऊन येत आहे. त्यानुसारच ते वाटेल ते आरोप करत आहे. गेल्या वर्षभरापासून भाजपचे काही नेते आणि हस्तक हे मला सातत्याने येऊन भेटत आहे. या सरकारच्या मोहात पडू नका, हे सरकार कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही पाडायचे ठरवले आहे. या ना त्या मार्गाने इशारे देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मागेही मला धमकावण्यात आले आहे' असा धक्कादायक खुलासा राऊत यांनी केला. IND vs AUS: स्टीव्ह स्मिथवर सात वर्षांनी आली ‘ही’ वेळ! 'जर पैशांच्या व्यवहारांची चौकशीच केली जात असेल तर भाजपचे अकाऊंट उघडा, गेल्या 3 वर्षांमध्ये  किती कोटींच्या देणग्या दिल्या आहे, त्याचा हिशेब भाजपच्या नेत्यांनी करावा, माझ्याकडे 20 कोटींचा हिशेब आता माझ्याकडे आहे.  त्यासंदर्भातील माहिती सचिन सावंत यांनी ट्वीट सुद्धा केली आहे, भाजपच्या एका खासदाराचा एका बांधकामात सहभाग आहे, मग त्यांना नोटीस का नाही पाठवली?' असा सवालही राऊत यांनी विचारला.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या