मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

भाजप हे देशावर आलेलं संकट, शरद पवारांची घणाघाती टीका

भाजप हे देशावर आलेलं संकट, शरद पवारांची घणाघाती टीका

'तुम्ही किती ही ईडी लावा, सीबीआय लावा काहीही झालं तरी राज्यातलं हे सरकार पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल'

'तुम्ही किती ही ईडी लावा, सीबीआय लावा काहीही झालं तरी राज्यातलं हे सरकार पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल'

'तुम्ही किती ही ईडी लावा, सीबीआय लावा काहीही झालं तरी राज्यातलं हे सरकार पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल'

पुणे, 17 ऑक्टोबर : आज राज्यातील अनेक मंत्र्यांवर सरकारी यंत्रणाचा वापर करून दबाव टाकला जात आहे.  सत्ता आहे म्हणून केंद्रातील हे सरकार अस करतंय. भाजप (bjp) हे देशावर आलेलं संकट त्यांना दूर केलं पाहिजे' अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी केली. तसंच, 'तुम्ही कितीही ईडी लावा, सीबीआय लावा काहीही झालं तरी राज्यातलं हे सरकार पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल' असंही पवार म्हणाले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचा मेळावा पार पडला. यावेळी शरद पवार यांनी भाजप सरकारवर सडकून टीकास्त्र सोडले. सरकारला अस्थिर करण्यासाठी आज सरकारी यंत्रणाचा गैरवापर केला जात आहे. अनिल परब, भावना गवळी नावाची एक मुलगी यांच्या सगळ्यांकडे ईडीच्या नोटीस पोहोचल्या आहे. अजित पवार यांच्याकडे काही सापडत का म्हणून कुटुंबातल्या मुलींना चौकशीला बोलावता. तुम्ही किती ही ईडी लावा, सीबीआय लावा काहीही झालं तरी राज्यातलं हे सरकार पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल. मुळात भाजप हे देशावर आलेले संकट आहे, अशी टीका शरद पवारांनी केली. 'सुदैवाने उद्धव ठाकरेंच्या हातात राज्याची धुरा दिली आहे. औद्योगिक धोरणांमध्ये जी कामाची गरज आहे ती पूर्ण करतोय. आज केंद्राकडून राज्याला मदत होत नाही. राज्याचे पैसे मिळत नाही, GST चे तीस हजार कोटी मिळाले नाही. मदत करण्यापेक्षा राज्यातलं सरकार पडायचे प्रयत्न करतात, ईडी, सीबीआयचा वापर करतात. मुंबईचे माजी पोलीस कमिशनर गायब होतो ही गोष्ट इतिहासात घडली नाही, असंही पवार म्हणाले. पती-पत्नीच्या भांडणात 9 महिन्यांच्या बाळाचा बळी, दांडक्याने मारून घेतला जीव 'केंद्रीय कृषिमंत्री होतो तेव्हा 4 दिवसाचं धान्य शिल्लक होतं. तातडीने आयात करावं लागणार होतं मी सही केली नाही आणि 2014 पर्यंत अश्या योजना राबवल्या त्याचा परिणाम देशाची गरज भागवून 18 देशांना आपण गहू निर्यात करणारा देश म्हणून हिंदुस्तानची ओळख झाली. जगात दोन नंबतचीसाखर निर्यात करणारा देश ठरला, मिळालेली सत्ता कष्टकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी वापरल्या तर तो सगळ्यांच्या भुकेचा प्रश्न मिटवतो आज बरोबर उलट परिस्थिती आहे, असंही पवार म्हणाले. शी! थुंकी लावून तंदूरी रोटी; ढाब्याचा VIDEO समोर आल्यानंतर परिसरात खळबळ 'महागाई चा प्रश्न वाढला. रोज सकाळी एक महत्वाचा प्रश्न असतो पेट्रोल, डिझेल, गॅस किती वाढला. भगिनीचं घर चालवायचं बजेट किती वाढलं. मनमोहन सिंग पंतप्रधान होते. किंमती वाढल्या तेव्हा आज जे सत्तेत आहेत त्यांनी दहा दिवस सभागृहाचं कामकाज होऊ दिलं नाही. तेव्हा आंतरराष्ट्रीय दर वाढले होते आता ते कमी झाले तरी इथले होत नाहीत, असा टोलाही भाजपला लगावला.
First published:

Tags: NCP, Sharad pawar, शरद पवार

पुढील बातम्या