'युती असल्याने इनकमिंगला मर्यादा पण लवकरच होणार मेगाभरती'

भाजपमध्ये पुढच्या 4 - 5 दिवसांत मेगाभरती होणार आहे, असं भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. अनेक जण पक्षात यायला उत्सुक आहेत पण युती असल्याने इनकमिंगला मर्यादा आहेत, असंही ते म्हणाले.

News18 Lokmat | Updated On: Sep 2, 2019 03:45 PM IST

'युती असल्याने इनकमिंगला मर्यादा पण लवकरच होणार मेगाभरती'

विवेक कुलकर्णी

मुंबई, 2 सप्टेंबर : भाजपमध्ये पुढच्या 4 - 5 दिवसांत मेगाभरती होणार आहे, असं भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. अनेक जण पक्षात यायला उत्सुक आहेत पण युती असल्याने इनकमिंगला मर्यादा आहेत, असंही ते म्हणाले.भाजपला 240 पेक्षा जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे, असा अंदाज त्यांनी वर्तवला. काँग्रेस - राष्ट्रवादीची स्थिती या निवडणुकीत गंभीर होईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.

विधानसभा निवडणुकांसाठी भाजप आणि शिवसेनेच्या जागावाटपाचा फॉर्म्युला काय असेल याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये पुढच्या 10 दिवसांत जागावाटपाचा फॉर्म्युला ठरेल, अशी खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे.

मागची विधानसभा निवडणूक भाजप आणि शिवसेनेने वेगवेगळी लढवली होती. त्यातल्या काही जागा भाजप आणि शिवसेनेच्या पारंपरिक जागा आहेत. पण काही जागांवरून भाजप आणि शिवसेनेत वाटाघाटी सुरू आहेत. या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेत जोरदार इनकमिंग झालं आहे. त्यामुळे पक्षांतर करून आलेल्या नेत्यांचं काय करायचं हाही प्रश्न या पक्षांसमोर आहे.

पाहा पुण्यातील गणपतीचा थाट, मिरवणुकीची खास ड्रोन दृश्यं VIDEO

Loading...

विधानसभा निवडणुका जवळ येत असतानाच भाजप आणि शिवसेनेच्या युतीबाबत शंका उपस्थित केल्या जात होत्या. स्वबळावर लढलं तर भाजपला बहुमत मिळेलं असं काही सर्व्हेत स्पष्ट झाल्यानं भाजप स्वबळाची तयारी करत असल्याचंही बोललं जाऊ लागलं होतं.या सगळ्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठा खुलासा केला. शिवसेना आणि भाजप यांची युती ठरली असून त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याचा प्रश्नच नाही. मनोमिलन तेव्हाच झालं असून आता पुढे युती आणखी भक्कम कशी करायची तेच ठरवायचं आहे असंही ते म्हणाले होते.

===============================================================================================

पृथ्वीवर चालण्यासाठी घालावा लागला चक्क स्पेस सूट, VIDEO VIRAL

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 2, 2019 03:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...