आता बोला!, भाजपने केली काँग्रेस आणि शिवसेनेला मदत

आता बोला!, भाजपने केली काँग्रेस आणि शिवसेनेला मदत

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र येत महाविकासआघाडी स्थापन केली. महाविकासआघाडी पॅटर्ननंतर आता भाजप, काँग्रेस आणि शिवसेना असा नवा पॅटर्नच अस्तित्वात आला आहे.

  • Share this:

बब्बू शेख, प्रतिनिधी

मनमाड, 12 डिसेंबर : काँग्रेसमुक्त भारत करण्याचा चंग भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी बांधला, तसं याबद्दल जाहीर सभांमधूनही अनेक वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी बोलूनही दाखवलं. एवढंच नाहीतर  काँग्रेसवर एकदाही टीका करण्याची संधी त्यांनी सोडली नाही. राज्यातही भाजप नेत्यांनी हाच कित्ता गिरवला. परंतु, मालेगाव महापालिकेमध्ये भाजपने चक्क काँग्रेस आणि शिवसेनेला मदत केली.

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र येत महाविकासआघाडी स्थापन केली. महाविकासआघाडी पॅटर्ननंतर आता मालेगावमध्ये भाजप, काँग्रेस आणि शिवसेना असा नवा पॅटर्नच अस्तित्वात आला आहे.

मालेगाव महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज निवडणूक झाली. या निवडणुकीत महापौरपदी काँग्रेसच्या ताहेरा शेख विजयी झाल्या त्यांनी महागटबंधन आघाडीच्या  शान-ए-हिंद निहाल अहमद यांचा 21 मतांनी पराभव केला. ताहेरा शेख यांना 51 तर शाने हिंद यांना ३२ मते मिळाली.

महापौर निवडीनंतर उपमहापौरपदासाठी निवडणूक घेण्यात आली त्यात शिवसेनेचे निलेश आहेर यांनी महागटबंधन आघाडीचे अन्सारी अमान्तुल्ला अहेमद यांचा २१ मतांनी पराभव केला. आहेर यांना देखील 51 तर अन्सारी यांना ३२ मते मिळाली.

या निवडणुकीत कॉंग्रेस आणि शिवसेनेने युती केली केलेली असताना भाजप देखील युतीत सहभागी झाली. त्यामुळे एकूण 86 नगरसेवक असलेल्या महापलिकेत कॉंग्रेसचे 29,शिवसेना 13 आणि भाजपा 9 असे एकूण 52 नगरसेवकांचे बलाबल झाल्यामुळे महापौर आणि उपमहापौर निवडणूक सोपी झाली होती.

निवडणुकीत विजय मिळताच कॉंग्रेस-शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे जल्लोष केला. मालेगावचा चेहरा-मोहरा बदलून जनतेच्या समस्या सोडविण्यास आपण प्राधान्य देणार असल्याचं नवनिर्वाचित महापौर ताहेरा शेख आणि उपमहापौर  निलेश आहेर यांनी सांगितलं.

एकीकडे भाजप राज्यातील शिवसेना-कॉंग्रेस महाआघाडी सरकारच्या विरोधात असताना दुसरीकडे मालेगावात मात्र भाजपने शिवसेना-कॉंग्रेससोबत हातमिळवणी केल्यामुळे हा नवीन पॅटर्न चर्चेचा विषय ठरला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 12, 2019 05:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading