24 मार्च : केंद्रातलं आणि राज्यातलं भाजप सरकार घोषणाबाजीत हिरो आणि कामात मात्र झिरो असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलीय.
अमरावतीमधील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षण शिबिरात अशोक चव्हाण उपस्थितीत होते. आगामी 2019च्या निवडणुकांची रणनीती आखण्यासाठी अमरावतीमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलंय, या शिबिरात अशोक चव्हाणबरोबरच पृथ्वीराज चव्हाण आणि इतर काँग्रेसच्या दिग्ग्ज नेत्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं.
यावेळी मंत्रालयातील उंदरांना मारण्यासाठी सरकार करोडो रूपये खर्च करतेय पण यांच्याकडे शेतकऱ्यांसाठी पैसा नाही अशी टीकाही अशोक चव्हाण यांनी केलीये.
तसंच या जनविरोधी सरकारला सत्तेवरून पायउतार करण्यासाठी सरकारविरोधातील संघर्ष तीव्र करा असं आवाहन चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.