फडणवीस मंत्रिमंडळाने घेतले 7 महत्त्वाचे निर्णय, 'या' योजनांना दिला हिरवा कंदील

फडणवीस मंत्रिमंडळाने घेतले 7 महत्त्वाचे निर्णय, 'या' योजनांना दिला हिरवा कंदील

यामध्ये अनेक योजनांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत तर जळगाव जिल्ह्यातील निंभोरासिम येथील हतनूर धरणबाधित मागासवर्गीय कुटुंबांना विशेष बाब म्हणून संपादित घराच्या किंमतीऐवढी नुकसान भरपाई देणार असल्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

  • Share this:

मुंबई, 09 जुलै : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत 7 मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये अनेक योजनांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत तर जळगाव जिल्ह्यातील निंभोरासिम येथील हतनूर धरणबाधित मागासवर्गीय कुटुंबांना विशेष बाब म्हणून संपादित घराच्या किंमतीऐवढी नुकसान भरपाई देणार असल्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले 7 महत्त्वाचे निर्णय

1.    राज्यातील अवर्षण प्रवण क्षेत्र, आत्महत्याग्रस्त जिल्हे आणि केंद्र शासनाने वेळोवेळी घोषित केलेल्या नक्षलग्रस्त जिल्ह्यांसाठी मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना सुरू

2.    सक्षम प्राधिकाऱ्याच्या पूर्वपरवानगीशिवाय झालेली जमिनींची हस्तांतरणे नियमानुकूल करण्यासाठी इनाम किंवा वतन विषयक प्रमुख कायद्यांत सुधारणा करण्यास मान्यता

3.    राज्याच्या बंदर विकास धोरण-2016 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी त्यामध्ये विविध सुधारणा करण्यास मंजुरी

4.    सार्वजनिक हितासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) हस्तांतरित होणाऱ्या जमिनींचे मुद्रांक शुल्क माफ

5.    रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण व गुहागर या दोन तालुक्यांसाठी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाची स्थापना चिपळूण येथे करण्याचा निर्णय

6.    जळगाव जिल्ह्यातील निंभोरासिम येथील हतनूर धरणबाधित मागासवर्गीय कुटुंबांना विशेष बाब म्हणून संपादित घराच्या किंमतीऐवढी नुकसान भरपाई देणार

7.    अल्पसंख्याक समुदायातील महिलांना बचतगटांची स्थापना करुन कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्याच्या योजनेस मान्यता

मुंबई काँग्रेसमधील धुसफुस दिल्ली दरबारी; संजय निरूपमांवर हायकमांड नाराज !

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर देखील मुंबई काँग्रेसमधील नाराजी अद्यापही कायम आहे. मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरूपम विरूद्ध मिलिंद देवरांमधील वाद आता सार्वजनिक झाला असून त्याची दखल आता दिल्ली दरबारी देखील घेतली गेली आहे. संजय निरूपम यांनी मिलिंद देवरा यांच्यावर ट्विटरवरून नाव न घेता टीका केली होती. यामध्ये त्यांनी उर्मिला मातोंडकर यांनी 16 मे रोजी मिलिंद देवरांनी लिहिंलेलं पत्र प्रसार माध्यमांना दिलं गेलं. ते आपले मार्गदर्शक जेटलींकडून शिकले का? असा सवाल केला होता. त्यावर भाई जगताप यांनी देखीव नाराजी व्यक्त केली होती. या साऱ्याची दखल आता दिल्लीत घेतली असून संजय निरूपम यांना दिल्लीला बोलावून घेतलं गेलं आहे. यावेळी त्यांना समज दिली जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

हेही वाचा : नितेश राणेंना राष्ट्रवादी काँग्रेस, मनसेचा पाठिंबा; 16 जुलैला जेलभरो

काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद

मुंबई काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी संजय निरूपम यांच्याकडून मुंबई अध्यक्षपदाची धुरा काढून घेत मिलिंद देवरा यांच्याकडे देण्यात आली. पण, काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर उर्मिला मातोंडकर यांनी मिलिंद देवरा यांना पत्र लिहत काँग्रेस नेत्यांनी मदत न केल्याची तक्रार केली. हे पत्र सार्वजनिक झाल्यानंतर मुंबई काँग्रेसमधील सर्व गोष्टी समोर आल्या. या साऱ्याची दखल आता दिल्लीमध्ये घेण्यात आली आहे.

EXCLUSIVE VIDEO: पुढचा बाण विधानसभेलाच लागला पाहिजे- सुरेखा पुणेकर

First published: July 9, 2019, 2:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading