बीड, 18 डिसेंबर : सोशल मीडियावर अनेक चॅलेंजेस दिली जात असतात कधी लपलेला प्राणी ओळखण्याचं तर कधी एखाद्या फोटोमधील चूक किंवा दडलेली घटना शोधण्याचं. ही गंमत राजकीय वर्तुळातही आता रंगताना दिसत आहे. याचं कारण पण तेवढंच खास आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी एक युझर्सला चॅलेंज दिलं आहे. त्यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून फोटो शेअर करून हे चॅलेंज दिलं आहे.
एका फोटो ट्वीट करून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी हे चॅलेंज जनतेला दिलं आहे. या फोटोमध्ये ओळखा पाहू? असा प्रश्न विचारत कॅप्शन दिलं आहे. हा फोटो आतापर्यंत हजारो युझर्सनी पाहिला असून 50 हून अधिक लोकांनी रिट्वीट केला आहे तर केवळ 16 जण या फोटोवर उत्तरं देऊ शकले आहेत. पंकजा मुंडे यांनी दिलेलं हे चॅलेंज तुम्हाला जमलंय का?
प्रत्येक विजयात संघर्ष आणि प्रत्येक संघर्षावर विजय हे समीकरण महाराष्ट्रा समोर मांडणारा फाटक्या मोडक्या सामान्य जनतेचा देव लोकनेता स्व गोपीनाथ मुंडे साहेब❤
या फोटोवर कमेंट करत प्रत्येक विजयात संघर्ष आणि प्रत्येक संघर्षावर विजय हे समीकरण महाराष्ट्रा समोर मांडणारा फाटक्या मोडक्या सामान्य जनतेचा देव लोकनेता स्व गोपीनाथ मुंडे साहेब असं निखील खेडकर नावाच्या युझरने म्हटलं आहे. अनेक युझर्सनी हा फोटो लोकनेते गोपिनाथ मुंडे यांचा असल्याच्या कमेंट्स केल्या आहेत. तर दुसरा युझर म्हणतो, संघर्ष योद्धा लोकनेता दीनदुबळ्यांचा आवाज शेतकऱ्यांना आणि ऊसतोड कामगारांना न्याय मिळवून देणार नेतृत्व आमचा दैवत आमचा स्वाभिमान साहेब यांचा हा फोटो आहे.
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना हे चॅलेंज दिलं आहे. आतापर्यंत 16 युझर्सनी यावर कमेंट्स केल्या आहेत. युझर्सनी गोपिनाथ मुंडे यांचा फोटो असल्याच्या कमेंट्स केल्या आहेत. पंकजा मुंडे यांनी शेअर केलेल्या या फोटोत नेमकं कोण आहे हे तुम्हाला ओळखायला जमलं का? घेऊन पाहा तुम्हीही हे चॅलेंज.