मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

गोपीचंद पडळकरांनी पुकारले आंदोलन, अन् नेत्यानेच केला संयोजकावर चाकूने हल्ला

गोपीचंद पडळकरांनी पुकारले आंदोलन, अन् नेत्यानेच केला संयोजकावर चाकूने हल्ला

धनगर नेते अर्जुन सलगर यांनी गोपीचंद पडळकरांवर टीका केली होती. त्यातूनच सोशल मीडियावर टीका टिप्पणी सुरू झाली.

    सोलापूर, 28 सप्टेंबर : धनगर समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्यभर 'ढोल बजाओ, सरकार जगाओ' आंदोलनाची हाक दिली होती. मात्र, सोलापुरात याच आंदोलनाच्या संयोजकावर खूनी हल्ला झाला आहे. हा हल्ला धनगर समाजाच्या नेत्यानेच केला आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. अक्कलकोट रोडवरील मल्लिकार्जुन नगर रोडवर घडली आहे. गोपीचंद पडळकर यांचे समर्थक आणि सोलापुरातील आंदोलनाचे संयोजन शरणू हांडे यांनी केले होते. त्या मोर्चात धनगर नेते अर्जुन सलगर यांनी गोपीचंद पडळकरांवर टीका केली होती. त्यातूनच सोशल मीडियावर टीका टिप्पणी सुरू झाली. सोशल मीडियावरच दोन्ही नेत्यांमध्ये वाद पेटला होता. लवकरच  रेस्टॉरन्ट्स सुरू होण्याची शक्यता, चालकांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट या वादातूनच सलगर आणि हांडे यांच्यात वाकयुद्ध सुरू झाले आणि त्यातूनच हांडे यांच्यावर रविवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास पाच ते सहा तरूणांनी चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात हांडे जखमी झाले आहेत. या प्रकरणी धनगर समाजाचे नेते अर्जुन सलगर, सुजित कोपरे, अनिकेत तुळ, लखन गावडे आणि इतर चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे. सुशांत प्रकरणात छाती बडवून घेणारे आता कुठे गेले? सेनेच्या मंत्र्यांचा थेट सवाल 25 सप्टेंबर रोजी  एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे, या मागणीसाठी धनगर समाजानं शुक्रवारी ढोल बजाव आंदोलन पुकारले होते. सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी ढोल बजाव आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर हा प्रकार घडला.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या