मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /भाजपला खूप दिवसांनी गुड न्यूज! सांगलीत आघाडीवर मात करत महापौरपदी गीता सुतार विजयी

भाजपला खूप दिवसांनी गुड न्यूज! सांगलीत आघाडीवर मात करत महापौरपदी गीता सुतार विजयी

भाजपाच्या गीता सुतार यांना महापौर निवडणुकीत 43 मत मिळाली तर आघाडीच्या वर्षा निंबाळकर यांना 35 मते मिळाली.

भाजपाच्या गीता सुतार यांना महापौर निवडणुकीत 43 मत मिळाली तर आघाडीच्या वर्षा निंबाळकर यांना 35 मते मिळाली.

भाजपाच्या गीता सुतार यांना महापौर निवडणुकीत 43 मत मिळाली तर आघाडीच्या वर्षा निंबाळकर यांना 35 मते मिळाली.

सांगली, 07 फेब्रुवारी : सांगली महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपच्या गीता सुतार या विजयी झाल्या आहेत तर उपमहापौरपदी आनंदा देवमाणे यांनी विजय मिळवला आहे. आघाडीच्या उमेदवाराचा गीता सुतार यांनी अवघ्या सात मतांनी पराभव केला आहे. आघाडीच्या उमेदवार वर्षा निंबाळकर यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी धक्का बसलेल्या भाजपला सांगलीचा गड राखण्यामध्ये यश आलं आहे.

भाजपाच्या गीता सुतार यांना महापौर निवडणुकीत 43 मत मिळाली तर आघाडीच्या वर्षा निंबाळकर यांना 35 मते मिळाली. आघाडीच्या दोन्ही उमेदवारांचा 8 मतांनी पराभव झाला आहे. आघाडीच्या वर्षा निंबाळकर तर उपमहापौर पदाच्या योगेंद्र थोरात यांचा पराभव झाला आहे. महापौर, उपमहापौर निवडीसाठी शुक्रवारी सकाळी 11.30 वाजता निवड सभा पार पडली.

महापौर उपमहापौर निवडीसाठी आज पार पडलेल्या विशेष महासभेत पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचे सीईओ अभिजित राऊत यांनी काम पाहिले. यावेळी झालेल्या निवडणुकीत भाजपच्या महापौर पदाच्या उमेदवार गीता सुतार आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवार वर्षा निंबाळकर यांच्यात लढत झाली. या लढतीत भाजपाच्या गीता सुतार यांना 43 तर आघाडीच्या वर्षा निंबाळकर यांना 35 मते पडली. तर उपमहापौर पदाच्या निवडीत सुद्धा भाजपाचे आनंदा देवमाने आणि आघाडीचे योगेंद्र थोरात यांच्यात निवडणूक झाली.

इतर बातम्या - छातीत दुखायला लागलं म्हणून चिमुरड्याला केलं अ‍ॅडमिट, X-ray पाहून डॉक्टर घाबरले

या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार आनंदा देवमाने यांना 43 तर आघाडीचे उमेदवार योगेंद्र थोरात यांना 35 मते मिळाली. महापौर उपमहापौर पदाच्या निवडीत भाजपाने बाजी मारली असून महापौर पदी गीता सुतार तर उपमहापौर पदी आनंदा देवमाने हे विजयी झाले आहेत. या निवडणुकीत काही नगरसेवक फुटतील अशी चर्चा होती मात्र भाजपाने नगरसेवक एकसंग राहिल्याने ही निवडणूक भाजपाने आपल्या संख्या बळावर जिंकली आहे. निवडीची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

इतर बातम्या - भाजप कार्यकर्त्याची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लिहलं जीवन संपवण्याचं कारण

खरंतर भाजपमध्ये महापौर, उपमहापौर उमेदवारीवरून नाराजी होती. यावरून कोअर कमिटीमध्येही फूट पडल्याची ही चर्चा होती. ही फूट लक्षात घेत काँग्रेस आघाडीने भाजपच्या नाराज सदस्यांना हाताशी घेण्यास सुरुवात केली होती. ही बाब लक्षात घेत भाजपने अर्ज भरल्यानंतर नाराज इच्छुकांसह सदस्यांना गोवा सहलीला पाठवले होते. त्यांच्यासोबत कोअर कमिटीचे नेते माजी आमदार दिनकर पाटील, सुरेश आवटी, युवानेते सुयोग सुतार हे स्वत: सदस्यांसोबत होते. या निवडणुकांवरू भाजप नेत्यांमध्ये अजून धाकधूक होती.

इतर बातम्या - भीक कमी आणली म्हणून बापाने लेकाचा हात तोडला, दोन दिवस चिमुकला राहिला भटकत

First published:
top videos

    Tags: BJP, Election 2019, Maharashtra, Sangli municipal corporation, Sharad pawar