'युती'च्या घटकपक्षांची 'या' 14 जागांवर बोळवण, भाजपला मिळणार 150 जागा!

'युती'च्या घटकपक्षांची 'या' 14 जागांवर बोळवण, भाजपला मिळणार 150 जागा!

प्रत्येक जागेचं गणित भाजपने पडताळून पाहिल्याने कुठल्या उमेदवारांमध्ये जिंकण्याची ताकद आहे याचा अंदाज भाजपने घेतलाय. त्यामुळे मित्रपक्षांच्या दबावापेक्षा जिंकण्याची ताकद महत्त्वाची असल्याचा संदेशच भाजपने दिलाय.

  • Share this:

विवेक कुलकर्णी, मुंबई 02 ऑक्टोंबर : 'युती'च्या घटक पक्षांना 18 जागा देण्यात येणार अशी चर्चा असतानाच घटक पक्षांची आता 14 जागांवर बोळवण होणार अशी आता चिन्हं आहेत. त्यामुळे भाजपच्या जागा 146 वरुन 150 होण्याची शक्यता आहे. तर फलटणच्या जागेवर रयत क्रांती आणि आरपीआय या दोन्ही पक्षांनी दावा केलाय. 'युती'तले घटकपक्ष हे सर्व भाजपचे मित्रपक्ष आहेत. या सर्वच पक्षांनी जास्तीत जास्त जागा मिळाव्यात असा दबाव भाजपवर आणला होता. मात्र प्रत्येक जागेचं गणित भाजपने पडताळून पाहिल्याने  कुठल्या उमेदवारांमध्ये जिंकण्याची ताकद आहे याचा अंदाज भाजपने घेतलाय. त्यामुळे मित्रपक्षांच्या दबावापेक्षा जिंकण्याची ताकद महत्त्वाची असल्याचा संदेशच भाजपने दिलाय.

अशा आहेत घटक पक्षांच्या जागा

आरपीआय:

1) मानखुर्द (मुंबई)

2) माळशिरस (सोलापूर)

3) भंडारा

4) नायगाव (नांदेड)

5) पाथरी (परभणी)

6) एक जागा ठरायची आहे

अरुण गवळींची मुलगी भायखळ्यात शिवसेनेला देणार का धक्का?

शिवस्वराज्य पक्ष - 3

1) वर्सोवा (मुंबई)

2) किनवट( नांदेड )

3) चिखली ( बुलडाणा )

रयत क्रांती संघटना

1)पंढरपूर (सोलापूर)

2) अक्कलकोट (सोलापूर)

3) फलटण (सातारा)

रासप

1) जिंतूर (परभणी)

2) दौंड (पुणे)

आदित्य ठाकरेंना वरळीतून आघाडीचा 'हा' नेता देणार थेट आव्हान!

नवी मुंबईत उमेदवारीवरून ट्विटस्ट

नवी मुंबईच्या राजकारणात एक मोठा बदल होण्याची शक्यता आहे. गणेश नाईक हे ऐरोलीमधून निवडणूक लढवणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. पुत्र संदीप नाईकांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे. भाजपने गणेश नाईकांना तिकीट नाकारलं होतं. त्यावर वडिलांसाठी मुलाने उमेदवारीचा त्याग केला असल्याचं सांगण्यात येत आहे.

ऐरोली मतदार संघातून भाजपने संदीप नाईक यांना उमेदवारी दिली होती पण संदीप नाईकांऐवजी गणेश नाईक निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. आज दुपारी 3 वाजता या निर्णय जाहीर करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. भाजपने पहिल्या उमेदवार यादीत डावलल्यानंतर नवी मुंबईतील दिग्गज नेते गणेश नाईक यांनी आपल्या समर्थकांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली होती. त्यामुळे गणेश नाईक भाजप सोडण्याबाबत विचार करत आहेत का, अशी चर्चा सुरू झाली. मात्र आता नाईक यांचे सुपुत्र संदीप नाईक यांनी याबाबत खुलासा केला आहे.

उदयनराजेंविरोधात लढलेल्या नरेंद्र पाटलांनी पोटनिवडणुकीसाठी भूमिका केली स्पष्ट

'नाईक कुटुंब भाजपमध्येच आहे. आम्ही कुठल्याही पक्षात जाणार नाही. भाजपकडून उद्या मी उमेदवारी अर्ज भरणार आहे. गणेश नाईकही प्रचारात उतरणार आहेत,' अशी माहिती संदीप नाईक यांनी दिली होती. त्यात आता नवा ट्वीस्ट आला आहे.

दरम्यान, नवी मुंबईच्या बेलापूर मतदारसंघातून आमदार मंदा म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे नुकतेच भाजपमध्ये गेलेले गणेश नाईक हे नाराज असल्याची चर्चा सुरू झाली. त्यानंतर आता गणेश नाईकांनी महापालिका नगरसेवकांची महत्त्वाची बैठक बोलावली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 2, 2019 04:24 PM IST

ताज्या बातम्या