मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'राष्ट्रवादीची इच्छा नव्हती म्हणून मराठा आरक्षणाचा मुडदा पाडला', चंद्रकांत पाटलांची जहरी टीका

'राष्ट्रवादीची इच्छा नव्हती म्हणून मराठा आरक्षणाचा मुडदा पाडला', चंद्रकांत पाटलांची जहरी टीका


'पवारांचे भाष्य ऐकून मती गुंग झाली. खोटं बोला पण रेटून बोला, याची प्रचिती आज झाली'

'पवारांचे भाष्य ऐकून मती गुंग झाली. खोटं बोला पण रेटून बोला, याची प्रचिती आज झाली'

BJP formed committee for Maratha reservation सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या विरोधात दिलेल्या निर्णयानंतर भाजपनं या मु्द्दायवरून आघाडी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. रविवारी भाजपनं राज्यातील प्रमुख नेत्यांची एक बैठक घेत चंद्रकांत दादा पाटील यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षणविषयक समिती स्थापन केली.

पुढे वाचा ...

मुंबई, 16 मे : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळूच नये अशी राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) इच्छा होती, त्यामुळं त्यांनी अरक्षणाचा मुडदा पाडला, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली. भाजपने मराठा आरक्षणासाठी चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षणासाठी एक समिती (BJP formed committee for Maratha Reservation) स्थापन केली आहे. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना, यापुढं मराठा समाजाच्या कोणत्याही आंदोलनात भाजप पक्षीय ओळखीशिवाय सहभागी असेल, असं पाटील यांनी सांगितलं.

(वाचा-अशाने Corona कसा जाणार! काँग्रेस नेत्याच्या अंत्ययात्रेला हजारोंची गर्दी)

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या विरोधात दिलेल्या निर्णयानंतर भाजपनं या मु्द्दायवरून आघाडी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. रविवारी भाजपनं राज्यातील प्रमुख नेत्यांची एक बैठक घेत चंद्रकांत दादा पाटील यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षणविषयक समिती स्थापन केली. या बैठकीला विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आमदार आशिष शेलार शिवसंग्राम चे विनायक मेटे, विक्रम पाटील, श्रीकांत भारतीय यांचीही उपस्थिती होती.

कायदेतज्ज्ञांची समिती नेमून निकालपत्राच्या आधारावर महाविकास आघाडी सरकार कसं कमी पडले हे उघड करण्याचा प्रयत्न करत असल्याचं पाटील म्हणाले. तसंच आरक्षणासंदर्भात मराठा समाजाच्या नावाने आणि नेतृत्वात जी आंदोलने होतील त्यात भाजपा पक्षीय ओळखीशिवाय सहभागी असेल, असं आश्वासनही त्यांनी दिलं. सर्वोच्च न्यायालयान मराठा आरक्षणासंदर्भात दिलेल्या 600 पानी निकालपत्रात महाविकास आघाडीने मराठा समाजाची केलेली फसवणूक उघड झाली आहे. कालांतराने मराठा समाजातील प्रक्षोभ शांत होईल असं सरकारला वाटत असेल, पण मराठा समाज शांत होणार नाही कारण प्रश्न आयुष्याचा आहे, असंही पाटील म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने प्रत्यक्षात टिकणारं आरक्षण मिळवून दिलं होतं. पण मराठा समाजाल आरक्षण मिळावं असं राष्ट्रवादीला वाटतं नव्हतं, त्यामुळं त्यांनी आरक्षणाचा मुडदा पाडला असा आरोप पाटील यांनी केला. सर्वोच्च्च न्यायालयानं वारंवार वेळ देऊनही सरकार पुरे पडलं नाही त्यामुळं अखेर सर्वोच्च न्यायालयानं आरक्षणाच्या विरोधात निर्णय दिला.

(वाचा-Cyclone Tauktae: वादळाचा पुण्याला फटका बसण्यास सुरूवात, अनेक ठिकाणी झाडांची पडझड)

सरकारनं अजूनही फेरविचार याचिका टाकण्याबाबत निर्णय घेतलेला नाही. गायकवाड समितीचा अहवाल फेटाळला त्याबद्दल अजून विचार केलेला नाही. हा अहवाल योग्यरित्या मांडला नाही म्हणून फेटाळला गेला असा आरोपही पाटलांनी केला. दरम्यान, मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना प्रवीण दरेकर यांनी भागवत यांचं वाक्य सर्वांनाच उद्देशून होतं असं म्हटलं. महाराष्ट्रातल्या भयंकर परिस्थितीची त्यांना कल्पना आहे. त्यामुळं ते असं बोलले असंही दरेकर म्हणाले.

First published:

Tags: BJP, Chandrakant patil, Maratha reservation