मुंबई, 7 डिसेंबर : महाराष्ट्राच्या राजकारणात 2019 पासून मोठे उलटफेर होत आहेत. काहीच महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदेंनी केलेल्या राजकीय भुकंपामुळे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. राज्यातल्या या सत्तानाट्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणखी एक गुगली टाकला आहे. भर कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी आपला डोळा काँग्रेसच्या नेत्यावर असल्याचं विधान केलं आहे.
सिटिझनविल या पुस्तकाचा मराठी अनुवाद काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी केला आहे. या पुस्तकाच्या विमोचनाला देवेंद्र फडणवीस, बाळासाहेब थोरात आणि स्वत: सत्यजीत तांबे उपस्थित होते. याच कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी आपली नजर सत्यजीत तांबे यांच्यावर असल्याचं विधान केलं.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
'खरंतर बाळासाहेब माझी तक्रार आहे, तुम्ही किती दिवस असे नेते बाहेर ठेवणार आहात. जास्त दिवस बाहेर ठेवू नका, आमचाही डोळा मग त्यांच्यावर जातो. चांगली माणसं जमाच करायची असतात', असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
'बाळासाहेब जास्त दिवस सत्यजीत तांबेंना बाहेर ठेवू नका, आमचा डोळाही मग त्यांच्यावर जातो', देवेंद्र फडणवीस यांचं सूचक विधान#DevendraFadanvis #SatyajitTambe #BalasahebThorat #Congress pic.twitter.com/irxeDQ9ZTY
— News18Lokmat (@News18lokmat) December 7, 2022
देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर बाळासाहेब थोरात आणि सत्यजीत तांबे यांनाही हसू आवरलं नाही. फडणवीसांच्या भाषणानंतर सत्यजीत तांबे यांनीही भाषण केलं, यात त्यांनी फडणवीसांचं कौतुक केलं. देवेंद्र फडणवीस यांना चांगल्या लोकांची पारख आहे, अशी सूचक प्रतिक्रिया सत्यजीत तांबे यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Balasaheb thorat, BJP, Congress, Devendra Fadnavis