गुहागरवरून 'युती'त जुंपणार? भाजपच्या या नेत्याने दिला इशारा

पक्षाने संधी दिली तर आपण गुहागरमधून लढण्यास तयार असल्याचं भाजपच्या माजी आमदाराने सांगितलं.

News18 Lokmat | Updated On: Sep 9, 2019 07:02 PM IST

गुहागरवरून 'युती'त जुंपणार? भाजपच्या या नेत्याने दिला इशारा

स्वप्नील घाग, गुहागर 9 सप्टेंबर : राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव हे शिवसेनेत प्रवेश करणार हे आता स्पष्ट झालं. त्या प्रवेशाची तारिखही जाहीर झालीय. गुहागरमधूनच जाधव हे शिवसेनेच्या तिकीटावर लढण्याची शक्यता आहे. पक्षप्रमुखांनी संधी दिली तर निवडणूक लढविणार असल्याचंही जाधव यांनी जाहीर केलं. जाधव यांच्या या विधानानंतर भाजपचे माजी आमदार विनय नातू यांनीही गुहागरवर दावा सांगितलाय. पक्षाने संधी दिली तर आपण गुहागरमधून लढण्यास  तयार असल्याचं सांगितलं. हा मतदार संघ भाजपला सोडावा अशी मागणीही त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे केलीय. त्यामुळे गुहागर मतदार संघवरून आता कुरघोडी होण्यास सुरुवात झाली आहे.

ही जागा भाजपकडे होती. मात्र 2009मध्ये रामदास कदम यांच्या आग्रहामुळे ही जागा शिवसेनेला मिळाली. त्यानंतर विनय नातू यांनी भाजपविरुद्ध बंडखोरी करत श्रीधर सेना या वेगळ्या गटाची स्थापना करत निवडणुकही लढवली होती. त्यानंतर त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आलं होतं. 2014मध्ये भास्कर जाधव यांनी तिथे विजय मिळवला. आता जाधवच शिवसेनेत आले तर स्थानिक नेत्यांच्या आग्रहामुळे युतीत जुंपण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

MIM भूमिकेवर ठाम, प्रकाश आंबेडकरांची 'ही' ऑफर मान्य नाही - इम्तियाज जलील

लवकरच ठरणार युतीचा फॉर्म्युला

विधानसभा निवडणुकीसाठी  'युती'चा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरविण्यासाठी भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये अंतिम चर्चेला सुरुवात झालीय. या आधी प्राथमिक चर्चा झाली असली तरी ही चर्चा अंतिम फॉर्म्युला ठरविण्यासाठी असल्याने त्याला महत्त्व प्राप्त झालंय. चर्चेच्या काही फेऱ्या झाल्या असून अजुन काही फेऱ्या होणार आहेत. झालेल्या चर्चेचा तपशील दोन्ही पक्षांचे नेते आपापल्या ज्येष्ठ नेत्यांना देत आहेत. अंतिम तोडगा निघाल्यानंतरच भाजपचे अध्यक्ष आणि उद्धव ठाकरे भेटणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. गणेश विसर्जनापूर्वी हा तोडगा निघणार असल्याची शक्यता आहे.

Loading...

बैठक संपल्यानंतर उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांनी दिली 'ही' माहिती

भाजपकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन हे चर्चा करत असून शिवसेनेकडून सुभाष देसाई त्यात सहभागी आहेत. आज या सर्व नेत्यांमध्ये चर्चेच्या काही फेऱ्या झाल्यात मित्र पक्षांना द्यावयाच्या जागा आणि त्यानंतर दोन्ही पक्षांनी लढायच्या जागा, काही जागांची अदलाबदल अशा सर्व विषयांवर यात चर्चा झाली.

( वाचा : वंचित-MIMच्या युतीवर प्रकाश आंबेडकर काय म्हणाले? पाहा VIDEO )

निवडून येण्याची ताकद हाच सर्वात महत्त्वाचा निकष असल्याची माहितीही सूत्रांनी दिलीय. काही ठिकाणी दोन्ही दोन्ही पक्षांचा दावा असून तिथेच थोडा पेच निर्माण झालाय. मात्र चर्चेच्या माध्यमातून हे सर्व प्रश्न मार्गी लावण्याचा विश्वास दोन्ही पक्षांनी व्यक्त केलाय.

या चर्चानंतर चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना चर्चेची सर्व माहिती दिली. भाजप शिवेसेनेच्या बैठकीत काही जागांच्या अदलाबदली विषयी चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. तसंच घटकपक्षांना नेमक्या कोणत्या 18 जागा द्यायच्या याविषयी बैठकीत चर्चा झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 9, 2019 06:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...