भाजपचे माजी आमदार अनिल गोटेंचा राष्ट्रवादीत होणार प्रवेश

भाजपचे माजी आमदार अनिल गोटेंचा राष्ट्रवादीत होणार प्रवेश

शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या मुहूर्तावर अनिल गोटे राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेणार आहेत.

  • Share this:

मुंबई, 12 डिसेंबर : भाजपचे माजी आमदार अनिल गोटे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत अनिल गोटे प्रवेश करणार आहेत. गेल्या 26 वर्षांच्या राजकीय संघर्षानंतर 3 महिन्यांपूर्वी अनिल गोटे यांनी शरद पवार यांच्यासोबत मैत्री केली. त्यानंतर आज अखेर ते राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत.

अनिल गोटे यांनी महापालिका आणि लोकसभा निवडणुकीत भाजपला जोरदार आव्हान दिलं होतं. लोकसभा निवडणुकीआधी एप्रिल महिन्यात अनिल गोटे यांनी भाजपच्या सदस्यत्व आणि आमदारकीचा राजीनामा दिला होता. धुळे महानगरपालिका निवडणुकीपासूनच त्यांच्या भाजपमधील नेत्यांसोबत संघर्ष सुरू झाला. तसंच त्यांनी भाजप खासदार सुभाष भामरे यांच्याविरोधात लोकसभा निवडणुकही लढवली होती.

भाजपमध्ये भूकंप घडवणारी बातमी, पंकजा मुंडेंनी थेट फडणवीसांबद्दल केला मोठा गौप्यस्फोट!

आमदारकीचा राजीनामा देताना गोटे यांनी गिरीश महाजन यांच्यावर देखील गंभीर टीका केली होती. पक्षातील राजकारणाचा कंटाळा आल्याचं सांगत ते भाजपमधून बाहेर पडले. धुळे पालिका निवडणुकीत सुभाष भामरे यांनी गोटे यांना बाजूला ठेवले होते. तेव्हापासून गोटे आणि भामरे यांच्यातील वाद टोकाला गेला. बंडखोरी करत असताना यापुढे आपले एकच लक्ष आहे ते म्हणजे सुभाष भामरे असेही त्यांनी म्हटलं होतं.

भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर विधानसभा निवडणुकीत अनिल गोटे यांच्या लोकसंग्रामने काँग्रेस-राष्ट्रवादीला पाठिंबा दिला होता. मात्र त्यांनी अद्याप कोणत्याही पक्षात प्रवेश केला नव्हता. आज अखेर शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या मुहूर्तावर अनिल गोटे राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: NCP
First Published: Dec 12, 2019 10:29 AM IST

ताज्या बातम्या